#Maratha reservation : उदयनराजेंनी घेतली शंभूराज देसाईंची भेट.. - Udayan Raje met Shambhuraj Desai regarding Maratha reservation | Politics Marathi News - Sarkarnama

#Maratha reservation : उदयनराजेंनी घेतली शंभूराज देसाईंची भेट..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

उदयनराजेंनी सातारच्या किंवा फलटणच्या राजांविषयी बोलण्याचे टाळले. 

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी आज गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण व जिल्हा बँकेचे निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वेळ आल्यावर सर्व काही ठरवले जाईल सातारच्या किंवा फलटणच्या राजांविषयी बोलण्याचे टाळले. 

खासदार उदयनराजेंचे भेटीगाठीचे सत्र सध्या सुरूच असून आज त्यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. उदयनराजे म्हणाले की, शंभूराज देसाई आमचे जवळचे संबंध असून आम्ही नेहमी एकमेकांना भेटतो. आजच्या भेटीत त्यांनी मराठा आरक्षण आणि जिल्हा बँकेचे निवडणुकी संदर्भात चर्चा केलेली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मी सातारच्या किंवा फलटणच्या राज्यांच्या विचार न करता वेळ आल्यावर निर्णय असे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणासंदर्भात श्वेतपत्रिका काढण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे, अशी मी त्यांना विनंती केली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणप्रश्नाबाबत सर्व नेत्यांची एकत्रित बैठक होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

उदयनराजे भोसले म्हणाले की दोन दिवसात मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांसह संयुक्त बैठक बोलविण्यात आली आहे. मराठा आरक्षणाबाबत राजकारण करू नये, यासाठी एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी आमची मागणी आहे. कारण 8 मार्चपासून मराठा आरक्षणावर सुनावणी सुरू होत आहेत. याबाबत शंभूराज देसाई यांच्या सोबत आज चर्चा झाली. सातारा जिल्ह्याला आदर्श जिल्हा व्हावा, म्हणून प्रयत्न करणार आहे. 

हेही वाचा: ते शिवभक्त आहेत...दरोडेखोर नाहीत...संभाजीराजे  
शिवनेरी (पुणे) : शिवजयंतीनिमित्त गर्दी करू नये, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. आज शिवजयंतीनिमित्त रायगडावर जमलेल्या शिवभक्तांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या प्रकरणावरून खासदार संभाजीराजे संतप्त झाले आहेत. शिवजयंतीनिमित्त काल रायगडावर केलेल्या डिस्को रोषणाई वरून खासदार संभाजीराजे यांनी ट्विट करून पुरातत्व खात्याला फटकारले होते. आज पुन्हा रायगडावर शिवभक्तांवर झालेल्या लाठीचार्जमुळे संभाजीराजेंनी महाविकास आघाडी सरकारला खडेबोल सुनावले आहे. रायगडावर शिवभक्तांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी संभाजीराजेंनी राज्य सरकारचा निषेध केला आहे. संभाजी राजे म्हणाले की ते शिवभक्त आहेत, दरोडेखोर नाहीत.शिवजयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत किल्ले शिवनेरीवर जाऊन शिवजन्म स्थळाचे दर्शन घेतले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख