मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात होत आहे. या हिवाळी अधिवेशनात यंदा 6 अध्यादेश आणि 10 विधेयकं मांडण्यात येणार आहे. तसेच शोकप्रस्ताव व पुरवणी मागण्यांवर अधिवेनात चर्चा होणार आहे. महिला व बालकल्याण अत्याचाराबाबतच्या शक्ती कायदा विधेयक या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. यापूर्वी हे अधिवेशन 7 डिसेंबरला घेण्यात येणार होते.
विधान परिषद निवडणुकीतील पराभवामुळे चंद्रकांतदादांचा चेहरा पडला होता : अजित पवार #Sarkarnama #MarathiNews #SarkarnamaNews #PoliticalNews #ChandrakantPatil #Face #Fell #Defeat #LegislativeCouncil #Election #AjitPawar @AjitPawarSpeaks @NCPspeaks https://t.co/aE48DjWRqV
— Sarkarnama (@SarkarnamaNews) December 13, 2020
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला आहे. 'हिवाळी अधिवेशन दोनच दिवस घेतल्यामुळे अधिवेशाच्या पूर्वसंध्येला चहापानावर बहिष्कार टाकत आहे,' असे भाजपचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या काल झालेल्या पत्रकार परिषदेत ‘आणीबाणी’चा मुद्दा चांगलाच गाजला. मागच्या अधिवेशनाप्रमाणे यावेळीही सत्ताधारी गोंधळ घालून चर्चा न करता विधेयकं मंजूर करतील, दोन दिवसाच्या अधिवेशनात काय होणार आहे ? असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल लगावला होता.
नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन कोरोनामुळे यंदा मुंबईत घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. हे अधिवेशन दोन दिवसांचं होणार असल्यानं त्यावर भाजपसह विधानसभा अध्यक्षांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
हिवाळी अधिवेशन मुंबईत झाल्यास उपराजधानीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले नागपुरात अधिवेशनासाठी आग्रही असल्याने सरकारकडून मार्चच्या अधिवेशनाची तयारी दर्शवण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे समजते. विधानसभेचं कामकाज अधिक चांगल्या पद्धतीनं पार पडावं यासाठी नियमावली तयार करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून कामकाज करता येईल का? याबाबतची चाचपणी सुरु असल्याचे पटोले यांनी सांगितले.
ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशाराच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे. तर ओबीसींच्या तोंडचा घास हिरावण्याचा प्रश्नच येत नाही. विरोधी पक्षाने ओबीसींना चिथावणी देण्याचं काम करुन सामाजिक सलोखा बिघडवू नये, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
महाविकास आघाडी सरकारला नुकतेच वर्ष पू्र्ण झाले आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निव़डणुकीमुळे महाविकास आघाडी सरकारला विजय मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात विरोधी पक्ष भाजप सरकारला कोणत्या प्रश्नांवर घेरणार हे पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे.

