भारताचा चुकीचा नकाशा दाखविण्याप्रकरणी TWITTERचे एमडी मनीष माहेश्वरींवर गुन्हा दाखल - twitter india md manish maheshwari booked for showing distorted map of india | Politics Marathi News - Sarkarnama

भारताचा चुकीचा नकाशा दाखविण्याप्रकरणी TWITTERचे एमडी मनीष माहेश्वरींवर गुन्हा दाखल

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 29 जून 2021

यापूर्वीही टि्वटरने लेहला चीनचा भाग दाखविण्याची मोठी चुक केली होती.

मुंबई : आपल्या वेबसाईटवरून  ट्विवटरने जम्मू-काश्मीर आणि लडाखला वेगळ दाखवल्यानंतर भारताचा चुकीचा नकाशा हटविला आहे. काल रात्री उशीरा टि्वटरने ही चुक दुरुस्त केली आहे. पण टि्वटरच्या अडचणी अजून संपलेल्या दिसत नाही. भारताचा चुकीचा नकाशा दाखविल्याप्रकरणे टि्वटरचे व्यवस्थापकीय संचालक (भारत) मनीष माहेश्वरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशातील बुलंदशहर येथील बजरंग दलाचे एका नेत्याने ही तक्रार दाखल केली आहे. twitter india md manish maheshwari booked for showing distorted map of india

एनआयएच्या वृत्तानुसार, टि्वटरने आपल्या वेबसाईटवर भारताचा चुकीचा नकाशा दाखल्याप्रकरणी मनीष माहेश्वरी यांच्यावर कलम ५०५ (२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कलम ७४च्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल हा प्रकार उघडकीस आला. 

केंद्र सरकारनेही टि्वटरला या चुकीवर कारवाई होईल, असे संकेत दिले होते. त्यानंतर टि्वटने काही तासातच ही चुक दुरुस्त केली होती. टि्वटरच्या या चुकीवर सोशल मीडियातून अनेकांनी टीका केली आहे. टि्वरवर कारवाईची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. यापूर्वीही टि्वटने लेहला चीनचा भाग दाखविण्याची मोठी चुक केली होती. मनीष माहेश्वरी यांच्याकडे पोलिसांनी अनेक वेळा चैाकशी केली आहे. 

कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांचे अकाउंट टि्वटरने यापूर्वी  ब्लॉक केलं होतं. सरकारने म्हटले होते की ही बाब देशाच्या सार्वभौमत्वावर आणि अखंडतेशी निगडित आहे. जम्मू-काश्मीर आणि लेहला चीनचा भाग म्हणून दाखवल्याबद्दल केंद्र सरकारने ट्विटरला इशारा दिला होता. आधीच ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू असताना हे प्रकरण समोर आलं आहे. केंद्र सरकारकडून लवकरच ट्विटरला नोटीस पाठवली जाण्याची शक्यता आहे.  भारताचा चुकीचा नकाशा दाखविल्या प्रकरणी ट्विटरवर सक्त कारवाई देखील होवू शकते. मिळालेल्या माहितीनुसार ट्विटरला दंड आकारण्यात येवू शकतो. या व्यतिरिक्त, संबधित अधिकाऱ्यांना सात वर्ष तुरुंगवास ठोठावला जाऊ शकतो. 

अनिल देशमुखांना अटक होईल ; सर्व पुरावे EDच्या हाती  
मुंबई : ''माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक झाली आहे. देशमुखांच्या विरोधात सर्व पुरावे ईडीला मिळाले आहेत. देशमुखांना अटक होईल,'' असे अॅड. जयश्री पाटील यांनी सांगितले. अॅड. जयश्री पाटील यांनी देशमुख यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चैाकशीसाठी देशमुखांना ईडीने समन्स बजावले असून आज देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याची शक्यता आहे. अँड. पाटील यांनी माध्यमांना ही माहिती दिली. 
 Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख