पोलिसदलात मोठा खांदेपालट : ३७ ज्येष्ठ अधिकार्यांच्या बदल्या  

पुण्याचे अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांची ठाण्यात बदली केली गेली आहे.
 Transfers of 37 police officers .jpg
Transfers of 37 police officers .jpg

पिंपरी : राज्य पोलिस (Police) दलात सोमवारी (ता.२३ ऑगस्ट) मोठा खांदेपालट झाला. ३७ ज्येष्ठ आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात नऊ एडीजी म्हणजे अप्पर तथ अतिरिक्त पोलिस महासंचालक आहेत. १२ विशेष पोलिस महानिरीक्षक (स्पेशल आयजी) आणि तीन उपायुक्तांना (डीसीपी) पदोन्नती देण्यात आली आहे.  (Transfers of 37 police officers)  

पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांची ठाण्याला बदली झाली आहे. त्याच्या जागी पुण्यातील संजय शिंदे आले आहेत. पिंपरीतील पोलिस उपायुक्त (मुख्यालय) सुधीर हिरेमठ यांना सीआयडीत उपमहानिरीक्षक (डीआयजी) म्हणून पदोन्नती दिली गेली आहे. पुण्याचे अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांची ठाण्यात बदली केली गेली आहे. 

सोलापूरचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची पदोन्नतीवर मुंबईत बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी ठाण्यातील अप्पर पोलिस आयुक्त डी. आर. कराळे आले आहेत. नाशिक येथील राज्य पोलिस अकादमीच्या (एमपीए) संचालक अश्वती दोरजे यांना नागपूरचे सह आयुक्त म्हणून बदलीवर पाठवण्यात आले असून त्यांच्या जागी केंद्रातील प्रतिनियुक्तीवरुन आलेले राजेशकुमार मोर यांची नेमणूक करण्यात आली आहे. 



 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com