संबित पात्रा यांना Twitterचा दणका..Toolkit प्रकरणी पडले तोंडघशी..

टि्वटमध्ये संबित पात्रा यांनी फेरफार केल्याचा संशय टि्वटरने व्यक्त केला आहे.
0SB13.png
0SB13.png

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन कॅाग्रेसचा भाजपवर हल्लाबोल सुरु आहे. तर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी टि्वट Twitter करुन कॅाग्रेसवर टुलकिटचा Toolkit आरोप केला होता. यावरुन भाजप-कॅाग्रेसमध्ये चांगलेच शाब्दीक युद्ध रंगले. संबित पात्रा यांचे टि्वट बनावट असल्याचे टि्वटरनं म्हटलं आहे. या टि्वटमध्ये संबित पात्रा यांनी फेरफार केल्याचा संशय टि्वटरने व्यक्त केला आहे. toolkit case twitter tells sambit patras tweet manipulated media

ता. १८ मे रोजी संबित पात्रा यांनी हे टि्वट केलं होते. त्यासोबत काही डॅाक्यूमेंटही त्यांनी शेअर केले होते. त्यावर कॅाग्रेस पक्षाचा लोगो होता. संबित पात्रा यांच्या टि्वटवर टि्वटरने संशय घेतला आहे.  अशा टि्वटमुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो, म्हणून टि्वटरने या टि्वटला मैनिपुलेटेड मीडिया manipulated media असे म्हटलं आहे.

सोशल मीडियाच्या धोरणानुसार एखाद्या टि्वटचा स्त्रोत खात्रीलायक नसल्यास त्यांच्यावर असं लेबल लावण्यात येते. असं लेबल  व्हिडिओ, टि्वट, फोटो आणि कुठल्याही प्रकारच्या कंटेंटवर लावण्यात येते. अमेरिका राष्ट्रपती निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या अशा अनेक टि्वटवर अशा प्रकारचे लेबल लावण्यात आले होते. त्यानंतर डोनाल्ट ट्रम्प यांचे अंकाऊट बंद करण्यात आले होते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि अनेक वृत्तवाहिन्या जो अजेंडा राबवत आहेत, ते टूलकिट आता मिळाले आहे. सोशल मीडियामध्ये काँग्रेसचे एक टूलकिट राबवले जात आहे. ज्यात महामारीच्या काळात कशा प्रकारे राजकारण करायचे, याचे पद्धतशीर निर्देश आहेत.  जनतेमध्ये भ्रम पसरवून त्यांना आपला राजकीय स्वार्थ साधायचा आहे.  आता काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे, असे संबित पात्रा यांनी  म्हटलं होते. 

देश कठीण परिस्थितीतून जात असताना काँग्रेस सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आली आहे. आता भाजपनेही पलटवार सुरू केला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत काँग्रेसची एक टूलकिट समोर ठेवली. संबित पात्रा यांनी आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्यासाठी काँग्रेसने टूलकिट तयार केली आहे. संकटाच्या काळातही काँग्रेसकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
 Edited by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com