आजचा वाढदिवस   : अमरसिंह पंडित (माजी आमदार , प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस) - Today Birthday  Amarsingh Pandit Former MLA, State General Secretary NCP | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस   : अमरसिंह पंडित (माजी आमदार , प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस)

दत्ता देशमुख 
सोमवार, 31 मे 2021

मराठवाड्यातील दुष्काळ, पाणी व शेती आदी विषयांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे.

बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि राजकारणातले भिष्मपितामह अशी ओळख असलेले माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचे थोरले चिरंजीव अमरसिंह पंडित राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत. पंचायत समिती सभापतीपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या अमरसिंह पंडित यांनी जिल्हा परिषद सदस्य तसेच २००४ मध्ये भाजपच्या उमेदवारीवर गेवराई मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. Today Birthday  Amarsingh Pandit Former MLA, State General Secretary NCP

त्यांनी विधान परिषदेचे सदस्य म्हणूनही काम केले. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, राज्य सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही काम केले. सध्या ते मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सहचिटणीस असून चंपावती क्रीडा मंडळ, जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ, जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळासह जयभवानी सहकारी साखर कारखारा, शारदा प्रतिष्ठान आदी संस्थांचे ते अध्यक्ष आहेत. 

जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केले. शेतकरी, मराठवाड्याचे सिंचन, कापूस बोंडआळी तसेच विद्यार्थी शिष्यवृत्ती व वैद्यकपूर्व परीक्षेतील विभागनिहाय आरक्षण आदी प्रश्नांवर त्यांनी नेहमी सरकारला धारेवर धरले. त्यांच्या शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतापर्यंत १८०० हून अधिक सामुहिक विवाह झाले असून मतदार संघात जलसिंनाची कामेही मोठ्या प्रमाणात झाली. मराठवाड्यातील दुष्काळ, पाणी व शेती आदी विषयांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. शेती अभ्यासासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत परदेश दौरेही केले.

हेही वाचा : अजितदादा आठवलेंना म्हणाले, "दिल्लीत जाऊन मोदींना एवढचं सांगा..." 

मुंबई :  मुंबईतील मेट्रोच्या 2 ए आणि 7 या दोन मार्गिकांचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यात शाब्दीक जुगलबंदी रंगली.  एमएमआरडीएच्या कार्यक्रमात अजित पवार आणि आठवलेंना टोमणे मारले.  महाराष्ट्राला काय मदत हवी, अशी विचारणा आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अजित पवार यांच्याकडे केली होती. आठवले म्हणाले,  "अजित पवार यांच्या काय मागण्या आहेत ते त्यांनी सांगावं मी केंद्राकडे तशी मागणी करेन, जीएसटी टप्याटप्याने मिळेल." यावर अजितदादा म्हणाले की, रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री आणि माझ्याशी बोलताना महाराष्ट्राला काय मदत हवी, अशी विचारणा केली. त्यामुळे मी आठवलेंना तौते चक्रीवादळातील पीडितांना केंद्र सरकारकडून योग्य ती मदत मिळवून द्यावी, अशी विनंती केली."  यावेळी अजित पवार यांनी आठवले यांच्यासमोर काही प्रस्ताव मांडले. तुम्ही महाराष्ट्राला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा आता दिल्लीत जाऊन तुम्ही पंतप्रधान मोदी यांना भेटा आणि तौते चक्रीवादळासाठी योग्य ती मदत महाराष्ट्राला द्या, असे सांगा. गुजरातने काहीच मागणी केली नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1000 कोटींची मदत जाहीर केली. पण महाराष्ट्राला केंद्राकडून कोणतीही मदत मिळालेली नाही, याकडे अजित पवार यांनी आठवलेंचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख