दिवाळीपर्यंत हजार टन कांदा बाजारात :पीयूष गोयल  - Thousands of tonnes of onions in the market till Diwali: Piyush Goyal | Politics Marathi News - Sarkarnama

दिवाळीपर्यंत हजार टन कांदा बाजारात :पीयूष गोयल 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

गोयल म्हणाले, की दर नियंत्रणासाठी सरकारने वेळेत कांदा निर्यातीवर बंदी घातली आणि आयातीला प्रोत्साहन दिले.

नवी दिल्ली : देशातील कांद्याचे दर कडाडले असतानाच आणखी सात हजार टन कांद्याची आयात करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत आणखी हजार टन कांदा आयात केला जाईल, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री पीयूष गोयल यांनी आज स्पष्ट केले. कांद्याचा भाव रुपये किलोपर्यंत स्थिरावल्याचा दावाही त्यांनी केला. 

अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर गोयल यांनी ऑनलाइन पत्रकार परिषद घेऊन कांदा आयातीची माहिती दिली. नाफेडतर्फे कांदा आयात केला जात आहे तर खासगी व्यापारी देखील इजिप्त, अफगाणिस्तान आणि तुर्कस्थानमधून कांदा आयात करत आहेत. 

खरिपाच्या कांद्याचीही मदत 
गोयल म्हणाले, की दर नियंत्रणासाठी सरकारने वेळेत कांदा निर्यातीवर बंदी घातली आणि आयातीला प्रोत्साहन दिले. आयात कांद्यावरील औषध धुराळणीचे (फ्युमिगेशन) निकष डिसेंबरपर्यंत शिथिल करण्यात आले आहेत.

आतापर्यंत खासगी व्यापाऱ्यांनी टन कांदा आयात केला असून आणखी हजार टन कांदा दिवाळीपर्यंत आयात होईल. त्याचप्रमाणे पुढील महिन्यांपर्यंत खरीपाचा कांदाही बाजारात उपलब्ध होणार असल्याने दर नियंत्रणासाठी त्याची मदत होईल, असा दावा गोयल यांनी केला. 

बटाट्याचे दर वाढले 
कांद्यासोबतच बटाट्याचेही दर वाढू लागले आहेत. त्यापार्श्वभूमीवर हजार टन बटाटा भूतानमधून आयात केला जात असून रुपये किलोवर बटाट्याचे दर स्थिरावले आहेत. मात्र, दर नियंत्रणासाठी सरकार दहा लाख टन बटाटा आयात करणार असल्याचेही गोयल यांनी यावेळी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख