ज्यांनी खडसेंचा छळ केला त्याच पक्षात ते जात आहेत : दानवे

खडसेंसाठी हा निर्णय दुर्देवी असल्याचे दानवेंचे मत
Raosaheb Danve- Eknath Khadse
Raosaheb Danve- Eknath Khadse

जालना : एकनाथ खडसेंवर आरोप करून ज्या लोकांनी त्यांचा छळ केला त्याच पक्षात ते जात आहेत. हे भाजपपेक्षा नाथाभाऊंसाठी जास्त दुर्देवी आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.

खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. पक्षाने त्यांना चेहरा दिला. त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी दिली. त्यांच्यावर अनेक कोर्ट केस सुरू होत्या. त्यांचा निपटारा झाल्यानंतर पक्षाने त्यांना नक्कीच न्यय दिला असता. आम्ही समजा न्याय दिला असता तर याच मंडळींनी खडसेंचा विरोध केला असता. त्यामुळे नाथाभाऊंनी थांबायला हवे होते. ज्या पक्षांनी त्यांच्यावर आरोप करून त्यांचा छळ केला त्यातचे ते प्रवेश करत आहेत, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

एकनाथ खडसे हे येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी हा निर्णय दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

पक्ष सोडण्याची घोषणा करताना खडसे काय म्हणाले?

जळगाव : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझे आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामुळेच मी भारतीय जनता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, असा हल्लाबोल माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. 

राजीनामा दिल्यानंतर खडसे भावूक होत म्हणाले क, भाजप सरकारमध्ये माझ्या राजीनाम्याची मागणी कुणीही केली नव्हती. माझ्या चौकशीची कुणीही मागणी केली नव्हती. कुणीही राजीनामा मागितला नसताना मला राजीनामा द्यायला लावला. माझी तक्रार देवेंद्रजींवर आहे. माझ्यावर त्यांनी विनयभंगाचा खटला दाखल करायला लावला. हे मरणाहून मेल्यासारखं आहे. माझ्यासोबत अत्यंत खालच्या स्तराचं राजकारण केलं. माझा परिवाराला यामुळं मनस्ताप झाला. माझ्यावर पाळत ठेवली गेली. मंत्री असताना नऊ महिने पाळत ठेवली. मला काही मिळालं किंवा नाही मिळालं याचं दुख नाही, मी माझ्या ताकदिने ते मिळवलं, असं ते म्हणाले.

खडसे म्हणाले की, माझा निर्णय मी घेतला आहे. जनता माझ्यासोबत आहे. माझ्यावर खोटा विनयभंगाचा खटला दाखल केला. हे सर्वात त्रासदायक होतं, असं ते म्हणाले. मी आजवर जे मिळवलं ते माझ्या ताकतीने मिळवलं. भाजपमध्ये कुणाच्या उपकारानं पदं मिळवली नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होईपर्यंत माझ्यावर एकही आरोप झालेला नव्हता. मात्र त्यांनी माझं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मला तोंडावर एक बोलायचं आणि मागून माझ्याविषयी वेगळं षडयंत्र केलं गेलं, असंही खडसे म्हणाले.

मला भाजपमध्ये थांबवण्यासाठी किंवा चर्चेसाठी चंद्रकांत पाटील यांच्याशिवाय कुणीही फोन केला नाही, असंही ते म्हणाले. मी लाचार नाही, कुणाचे पाय चाटणारा देखील नाही, असंही खडसे म्हणाले. रक्षाताईं खडसे भाजप सोडणार नाहीत, त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा. आपल्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत, असंही ते म्हणाले. रोहिणी खडसे देखील जिल्हा बॅंकेवर राहतील, असंही ते म्हणाले. मी कुठल्याही आश्वासनावर राष्ट्रवादीत जात नाहीये, असंही ते म्हणाले. मी पदासाठी जात नाहीये, पद मी इथंही मिळवलं असतं, असंही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com