'सेंट्रल विस्टा'ला विरोध करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका - those demanding a ban on central vista project got a blow from the supreme court now they will have to pay fine | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

'सेंट्रल विस्टा'ला विरोध करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 29 जून 2021

विरोधी पक्षांनी या प्रकल्पावरुन मोदी सरकारला धारेवर धरले होते. 

नवी दिल्ली : सेंट्रल विस्टा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिला आहे. याचिकाकर्त्यांच्या विरोधात दंड करण्याचा आदेश बदलण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याचिकाकर्त्यांनी सर्व प्रकल्पांच्या स्थगितीची मागणी केली नाही, त्यामुळे दिल्ली उच्चन्यायालयाने दिलेला निकाल योग्य असल्याचे सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.  those demanding a ban on central vista project got a blow from the supreme court 

सेंट्रल विस्टा प्रकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त या प्रकल्पाचे नियोजन आहे. दिल्लीत लॅाकडाऊन झाल्यानंतरही या प्रकल्पाचे काम सुरू होते. या प्रकल्पाचा समावेश अत्यावश्यक सेवेत करण्यात आला आहे. विरोधी पक्षांनी या प्रकल्पावरुन मोदी सरकारला धारेवर धरले होते. 

  सेंट्रल विस्‍टा प्रोजेक्‍टसाठी ९७१ कोटींचा खर्च
तेरा एकर जमीनीवर नवीन संसद भवन उभारण्यासाठीचा सेंट्रल विस्टा प्रकल्प आहे. डिसेंबर २०२२मध्ये त्याचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. पंतप्रधानांचे निवास, उपराष्ट्रपतीभवन देखील तयार करण्यात येणार आहे. २०२४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. यासाठी सुमारे ९७१ कोटी रुपये खर्च येणार आहे.  

प्रियंका गांधी केला होता विरोध
काँग्रेसच्या नेत्या प्रिंयका गांधी यांनीही या प्रकल्पाला विरोध केला आहे. ''कोरोनाच्या संकटात देश आँक्सिजन, लस या संकटांचा सामना करीत असताना केंद्र सरकार पंतप्रधानाच्या घरासाठी खर्च करीत आहे. या निधीचा उपयोग कोरोनाशी लढणाऱ्या लोकांचे प्राण वाचविण्यासाठी होऊ शकतो. सेंट्रल विस्टा प्रकल्पाच्या माध्यमातून सरकार कोणत्या गोष्टींना प्राध्यान्य देत आहे, हे लक्षात येते,'' असे टि्वट करुन प्रिंयका गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. 
  Edited by : Mangesh Mahale 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख