They will say something and we will not accept it, the BJP warned | Sarkarnama

ते काही सांगतील आणि ते आम्ही मान्य करायचे हे चालणार नाही, भाजपला या मित्राने दिला इशारा

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

केंद्र सरकारने नुकतेच जे कृषि विधेयक आणले हे तातडीने मागे घ्यावे. हे विधेयक देशातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारे असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

नवी दिल्ली : आमचा पक्ष स्वतंत्र आहे. युती आहे याचा अर्थ असा होत नाहीत ते (भाजप) काहीही सांगतील आणि मान्य करायचे. हे चालायचे नाही असा खणखणीत इशारा शिरोमणी अकाली दलाचे नेते बलविंदर भुंदेर यांनी दिला आहे. 

प्रंजाबमध्ये कॉंग्रेसचे सरकार आहे आणि तेथे अमरिंदरसिंग यांच्या सारखा खमक्‍या मुख्यमंत्री आहे. अमरिंदरसिंह हे शिरोमणी अकाली दल असो की भाजप या दोन्ही पक्षांना ते नेहमीच आव्हान देत असतात. शिरोमणी अकाली दलाचे नेते तर तेथील कॉंग्रेस सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असतात. शेतकरी प्रश्‍नावरून शिरोमणी अकाली दलाने केंद्रातील भाजप सरकावरही टीका करायला सुरवात केली आहे. 

काही दिवसापूर्वी हरियाना, पंजाब तसेच इतर राज्यातील केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली होती. आज तर शिरोमणी अकाली दलाने मोदी सरकारवर टीका करून घरचा आहेर दिला आहे. केंद्र सरकारने नुकतेच जे कृषि विधेयक आणले हे तातडीने मागे घ्यावे. हे विधेयक देशातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारे असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी आहोत त्यामुळे केंद्राकडून शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होता कामा नये अशी मागणी असल्याचे या पक्षाने म्हटले आहे. 

बलविंदरसिंग बुंदेर यांनी म्हटले आहे, की मोदी सरकारने हे विधेयक दोन्ही सभागृहात प्रथम मागे घेतले पाहिजे. आपचा पक्ष स्वतंत्र आहे. भाजपशी युती आहे म्हणून त्यांनी काहीही सांगावे आणि मान्य करावे असा याचा अर्थ होत नाही. भाजप अजेंडा असेल तो त्यांचा आहे. आमचा अजेंडा वेगळा आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या मागे असल्याचे शेतकरी विरोधात असलेले विधेयक मागे घेतले पाहिजे अशी आमच्या पक्षाची भूमिका असल्याचेही ते म्हणाले. 

दरम्यान, दिल्ली दंगलप्रकरणी केंद्राने जे अटकसूत्र सुरू ठेवले त्या पार्श्वभूमी कॉंग्रेसचे नेते अहमद पटेल, डाव्या पक्षाचे नेते डी. राजा, सीताराम येचुरी, डीएमकेच्या नेत्या कनीमोझी आणि राजदचे नेते मनोज झा यांनी आज राष्ट्रपतींची भेट घेऊन चर्चा केली.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख