सुशांतसिंह केस : सीबीआयचे हे चार अधिकारी करणार तपास, दोन गुजरात केडरचे - these four officers from CBI will investigate the case of Sushantsinh death | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांतसिंह केस : सीबीआयचे हे चार अधिकारी करणार तपास, दोन गुजरात केडरचे

सरकारनामा ब्यूरो 
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

सीबीआयचे पथक लवकरच मुंबईत येऊन तपासाची कागदपत्रे घेणार 

नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यूचा तपास केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडे द्यायचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाची पुन्हा शून्यापासून छाननी  होणार आहे. या तपासावर सीबीआयच्या सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याचे नियंत्रण राहणार आहे. सहसंचालक, त्यानंतर उपमहानिरीक्षक, उपायुक्त आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक या दर्जाच्या अधिकाऱ्यांची उतरंड राहणार आहे. योगायोगाचा भाग म्हणजे यातील दोन अधिकारी हे गुजरात केडरचे आहेत. एकजण मूळचे बिहारचे पण केंद्रीय केडरचे आहेत. या चौघांत दोन महिला आहेत.

 

Gujarat-Cadre IPS Officer Manoj Shashidhar Appointed As CBI Joint ...

 

मनोज शशीधर- सीबीआयचे सहसंचालक असलेले शशीधर या तपासावर सर्वोच्च देखरेख ठेवतील. ते मूळचे केरळमधील असून 1994 च्या बॅचचे गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील समितीने त्यांची जानेवारी 2020 मध्ये त्यांची सीबीआयमध्ये नियुक्ती केली. बडोद्याचे पोलिस आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच गुजरातच्या राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

गगनदीप गंभीर कर सकती हैं सुशांत ...

गगनदिप गंभीर- पोलिस उपमहानिरीक्षक दर्जाच्या गगनदिप या पण गुजरात केडरच्या 2004 च्या बॅचच्या अधिकारी आहेत. पंजाब विद्यापीठाच्या टाॅपर असलेल्या गगनदिप यांनी सीबीआयकडे असलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास केला आहे. आॅगस्टा वेस्टलॅंड या हेलिकाॅप्टर खरेदीच्या गैरव्यवहाराचे प्रकरण त्यांनी तपासले आहे. तसेच बहुचर्चित विजय मल्ल्या यांची कर्जबुडी प्रकरणाचाही तपास त्यांनी केला आहे. गुजरातमधील प्रमुख शहरांत त्यांनी काम पाहिले आहे. 

Image may contain: 1 person, sunglasses and hat

नुपूर प्रसाद- या 2007 च्या बॅचच्या केंद्रीय केडरच्या अधिकारी आहेत. त्या मूळच्या बिहारच्या आहेत. सीबीआयमध्य येण्यापूर्वी त्या दिल्लीत पोलिस उपायुक्त म्हणून काम पाहत होत्या. त्यांची गेल्या वर्षीच सीबीआयमध्ये नियुक्ती झाली. 

 

अनिल यादव- हे सीबीआयमध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदावर काम करत आहेत. मुख्य तपासाचे, पुरावे गोळा करण्याचे काम यादव यांची टीम करणार आहे. सीबीआयमध्ये अनेक प्रमुख प्रकरणांचा तपास त्यांनी केला आहे. त्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकही मिळाले आहे. 

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या केसच्या आर्थिक मुद्याचा तपास सुरू केला आहे. त्याचा उपयोग सीबीआयला होऊ शकतो. बिहार पोलिसांनी याबाबत दाखल केलेल्या गुन्ह्यांची कागदपत्रे सीबीआयकडे आधीच दिली आहेत. आता महाराष्ट्र पोलिसांकडून तपास समजून घेणे, विविध व्यक्तींनी दिलेल्या जबाबांचा अभ्यास करणे, त्यातील कच्चे दुवे शोधणे, महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकाऱ्यांकडून अधिक माहिती घेणे यावर आता तपासाची पुढील दिशा निश्चित होईल.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख