पराभूत झालेल्या ममता बनू शकतात मुख्यमंत्री..हे आहेत पर्याय  - These are the options for Mamata Banerjee to become the Chief Minister | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

पराभूत झालेल्या ममता बनू शकतात मुख्यमंत्री..हे आहेत पर्याय 

अमोल जायभाये
मंगळवार, 4 मे 2021

विधान परिषद अस्तित्वात नाही. विधान परिषद नसल्यामुळे त्यांना विधानसभेलाच निवडूण यावे लागणार आहे.

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) २१३ जागा जिंकत तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) इतिहास घडवला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि भाजपचे (BJP) सुवेंदू अधिकारी यांच्यात नंदिग्राममध्ये थेट लढत होती. त्यामध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभाव झाला. यामुळे बंगालमध्ये 'गड आला पण सिंह गेला' अशी काहीशी अवस्था तृणमूल काँग्रेसची झाली आहे. मात्र, पराभव झाला असला तरीही ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) मुख्यमंत्री होऊ शकतात.  These are the options for Mamata Banerjee to become the Chief Minister 

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) तृणमूल काँग्रेस २१३, भाजप ७७, डावे 1 व इतर 1 असे चित्र आहे. राज्यात बहुमताचा आकडा पार करुन मोठ्या बहुमतासह पुन्हा एकदा ममता बॅनर्जी या सत्तास्थापन करणार आहेत, त्या उद्या ५ मेला मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. बंगालमध्ये भाजपचा हिंदुत्ववाद विरुद्ध ममतांची बंगाली अस्मिता अशी लढाई होती. ममता आणि सुवेंदू अधिकारी यांच्या नंदिग्राममधील सामना रंगतदार ठरला होता. ममतांनी त्यांचा पारंपरिक भवानीपूर मतदारसंघ सोडून त्यांनी नंदिग्राममधून निवडणूक लढवली होती. अतिशय अटीतटीच्या लढतीत शेवटच्या फेरीत अधिकारी विजयी झाले. 

हे ही वाचा : आता मृतदेहांच्या दागिन्यांचीही होतेय चोरी; कोरोना सेंटरमधील धक्कादायक प्रकार

ममता बॅनर्जींना हे आहेत पर्याय

पराभवनंतरही ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री बनू शकतात, तशी तरतूद संविधानात आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधानसभेचे सदस्य व्हावे लागणार आहे. त्यासाठी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्याकडे दोन पर्याय आहेत.  पश्चीम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागा आहेत. मात्र, २९२ ठिकाणीच निवडणुक झाली आहे. त्यामुळे दोन ठिकाणी अजून निवडणूक होणार आहे. 

त्या पैकी एका जागेवर त्या निवडणूक लढू शकतात, किंवा तृणमूल काँग्रेसच्या एखाद्या आमदाराला राजीनामा द्यावा लागेल. जेणेकरून त्या जागेवर पोटनिवडणूक होऊ शकेल. यासाठी ममता बॅनर्जी यांचा पारंपरीक मतदार संघ भवानीपूर मधूनही निवडणूक लढू शकतात. ममता बॅनर्जी यांना पुन्हा निवडणूक लढावी लागेल आणि विजयी व्हावे लागेल. या सर्वासाठी त्यांना सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. मात्र सहा महिन्यात विधानसभा सदस्य न झाल्यास त्यांना मुख्यमंत्री पदावर राहता येणार नाही.   

विधान परिषद नसल्याने अडचण 

पश्चिम बंगालमध्ये ( West Bengal) विधान परिषद अस्तित्वात नाही. विधान परिषद नसल्यामुळे त्यांना विधानसभेलाच निवडूण यावे लागणार आहे. विधान परिषद अस्तित्वात असलेल्या राज्यात विधानपरिषदेचे सदस्यत्व घेऊनही मुख्यमंत्री पदावर राहता येते. विधान परिषद हे विधीमंडळाचे वरिष्ट सभागृह आहे. सध्या देशात पाच राज्यात विधानपरिषद आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाणा, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यात विधान परिषद आहे. These are the options for Mamata Banerjee to become the Chief Minister

हे ही वाचा : आता 'महाविकास'चा करेक्ट 'कार्यक्रम होणार' का? 
 

पराभूत उमेदवारास विधान परिषदेवर बिनदिक्त निवडून आणता येते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ही कोणत्याच सभागृहाचे सदस्य नसतांना मुख्यमंत्री झाले. नंतर ते विधान परिषदेवर निवडून गेले. तशी सुविधा पश्चिम बंगालमध्ये ( West Bengal) नाही. बंगलाच्या राज्याच्या निर्मीतीवेळी विधान परिषद अस्तित्वात होती. ती २१ मार्च १९६९ रोजी बरखास्त करण्यात आली. विधान परिषद बरखास्त करण्याचा अधिकार विधानसभेला आहे.  
 
भाजप प्रचंड ताकदीने या निवडणुकीत उतरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra Modi) गृहमंत्री अमित शहा, (Amit Shah) भाजपचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासह अनेकांनी प्रचारासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. मोदींच्या सभा, शहांचे रोड शो यामुळे भाजपची हवा तयार करण्यात यश आले होते. मात्र, त्याचे मतदानात रुपांतर होऊ शकले नाही.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख