...म्हणून चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर सोडून कोथरूडला आले : रोहित पवार 

भाजपशासित केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करीत आहे.
... therefore  Chandrakant Patil left Kolhapur and came to Kothrud: Rohit Pawar
... therefore Chandrakant Patil left Kolhapur and came to Kothrud: Rohit Pawar

राजगुरुनगर (जि. पुणे) : "भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचे जिगर मोठे आहे, म्हणूनच ते कोल्हापूर सोडून भाजपसाठी अतिशय अवघड असलेल्या कोथरूडसारख्या मतदारसंघात उभे राहिले,' अशी उपहासात्मक टीका आमदार रोहित पवार यांनी येथे केली. 

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात आमदार पवार बोलत होते. 

ते म्हणाले, "भाजपशासित केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करीत आहे. महाराष्ट्राचा 28 हजार कोटींचा जीएसटी परतावा अद्याप दिलेला नाही. महाराष्ट्रामध्ये 2008 नंतरच्या मंदीच्या परिस्थितीतही 1 लाख 10 हजार कोटींची गुंतवणूक तेव्हाच्या यूपीए सरकारच्या माध्यमातून झाली होती, तर 2014 मध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात फक्त 66 हजार कोटींची गुंतवणूक आली आहे.' 

आमदार मोहिते म्हणाले, "पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या कक्षेत येणारे, खेड तालुक्‍यातील महाळुंगे हे पोलिस ठाणे बेकायदेशीर आहे. त्याची चौकशी करण्याची मागणी करुनही, ती होत नाही. त्याठिकाणचे अधिकारी कंपन्यांचे स्क्रॅप, लेबर, सिक्‍युरिटी, ट्रान्सपोर्ट इत्यादी ठेक्‍यांमध्ये भागीदार असतात. तसेच, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे कार्यकारी संचालकही या ठेक्‍यांमध्ये भागीदार असतात. त्यामुळे स्थानिक माणसाला न्याय मिळत नाही. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे अधिकारी खेड तालुक्‍याला सन्मानाची वागणूक देत नाहीत. एमआयडीसीतून फक्त हफ्ते गोळा करायचं काम करतात. म्हणून त्या आयुक्तालयाला जोडलेली गावे पुन्हा पुणे ग्रामीणला जोडावीत.' 

पिंपरी चिंचवडला भामा आसखेडचे थेंबभरही पाणी देणार नाही, याचा मोहिते यांनी पुनरुच्चार केला. तसेच, चासकमानचे बरेचसे पाणी पीएमआरडीए आणि "एसईझेड'साठी आरक्षित झाल्याने कळमोडीचे पाणीही कोणाला देता येणार नाही, असेही ते म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com