देवेंद्र फडणवीसांच्या शंभर पत्रांना मुख्यमंत्र्यांकडून केराची टोपली.. 

डिसेंबर 2019 ते मार्च 2020 याकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फडणवीसांनी पाठवलेल्या पत्रांना उत्तरच मिळालं नसल्याची माहिती आहे. एकाही पत्राचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले नाही.
2uddhav_devendra_20ff.jpg
2uddhav_devendra_20ff.jpg

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनेक पत्र लिहिली. पण एकाही पत्राला मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाने उत्तर दिले नाही, अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

डिसेंबर 2019 ते मार्च 2020 याकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फडणवीसांनी पाठवलेल्या पत्रांना उत्तरच मिळालं नसल्याची माहिती आहे. एकाही पत्राचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले नाही, पण त्या पत्रातील काही बाबींवर राज्य सरकारने विचार केला, त्यातच मला समाधान आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ 14 टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत 42 टक्के इतकी आहे. त्यामुळं मुंबईत तातडीनं चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर आधी कोरोना चाचण्या वाढवण्याचा सल्ला आणि मागणी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राव्दारे केली होती. पालघर साधुहत्याकांडप्रकरणीही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रांना उत्तर देण्यासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन केला होता. या पत्रांच्या माध्यमातून त्यांना नागरिकांच्या समस्या, अडचणी समजण्यास मदत होत होती. 

 
हेही वाचा : सावरकरांना 'भारतरत्न' का दिले नाही : संजय राऊतांचा भाजपला सवाल
मुंबई : मुंबईच्या स्वातंत्र्यवीर स्मारकात दसरा मेळावा घेतल्याबद्दल टीका करणाऱ्या भाजप नेत्यांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. आमच्यावर टीका करणाऱ्यांना सावरकरांना अद्याप 'भारतरत्न' का दिले नाही, असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. हिंदुत्वाशी तडजोड नाही अशी भाषा अनेक वर्षे  करणारे उध्दव ठाकरे हे सत्तेसाठी हिंदुत्वापासून दूर गेलेच; पण ज्या स्वातंत्रवीर सावरकरांवर टीका काँग्रेसने टीका केली त्याबद्दल त्यावेली अवाक्षर न काढणारे आज उध्दव ठाकरे यांना आज सावरकर स्मारकात यावे लागले हाच काव्यागत न्याय आहे, अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. त्यावरुन राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com