Thank You Modiji : इंधन दरवाढीवरून वाहनचालकांची भन्नाट शक्कल! - ThankYouModijiChallenge is trending social media amid petrol price hike | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

Thank You Modiji : इंधन दरवाढीवरून वाहनचालकांची भन्नाट शक्कल!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 जुलै 2021

मागील काही महिन्यांपासून देशात पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढत चालले आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली असून डिझेलचे दरही जवळपास पोहचले आहेत.

पुणे : इंधन दरवाढीने त्रस्त आहात... त्याचा निषेधही करायचाय... मग तुम्हाला हे चॅलेंज स्वीकारावं लागेल. त्यासाठी वाहनचालकांनी एक भन्नाट शक्कल लढवली आहे. पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला हात जोडून नमस्कार करताना अनेक जण दिसू लागले आहेत. #ThankYouModijiChallenge या ट्रेंडने सध्या सोशल मीडियात लोकप्रिय होऊ लागला असून त्यातून मोदींवर उपरोधिक टीका केली जात आहे. (#ThankYouModijiChallenge is trending social media amid petrol price hike)

एकीकडे पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असताना मागील 6 महिन्यांत एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 140 रुपयांची वाढ झाली आहे. याचबरोबर विमान इंधनाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरानं शंभरी पार केली आहे. तर डिझेलचे दरही लवकरच शंभरी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यावरून विरोधकांनीही रान उठवले आहे. काँग्रेससह सर्वच पक्षांकडून मोदी सरकारला धारेवर धऱले जात आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या संसदेच्या अधिवेशनावरही इंधन दरवाढीचे सावट आहे. तर सर्वसामान्य नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून इंधन दरवाढीचा निषेध आगळ्यावेगळ्या पध्दतीने केला जात आहे.

हेही वाचा : 'पिगॅसस'चा धुमाकूळ; दोन केंद्रीय मंत्र्यांसह राहुल गांधी, प्रशांत किशोर यांचा फोन हॅक

#ThankYouModijiChallenge हा ट्रेंड सोशल मीडियात लोकप्रिय होऊ लागला आहे. देशातील बहुतेक पेट्रोल पंपांवर पंतप्रधान मोदींचा फोटो असलेले फलक आहेत. या चॅलेंजमध्ये मोदींच्या फोटोला हात जोडून नमस्कार करतानाचे फोटो या हॅशटॅगसह सोशल मीडियात पोस्ट केले जात आहेत. मोदी सरकारवर थेट टीका करण्याऐवजी इंधन दरवाढीबद्दल त्यांचे आभार मानत उपरोधिक टोला लगावला जात आहे. हे चॅलेंज अनेक जण स्वीकारत असून त्यात महिलांचाही समावेश आहे. 

काही जणांनी तर चारचाकी वाहनांवर तर काही काहींनी जमिनीवर झोपून साष्टांग नमस्कार घातला आहे. काहींचे अर्धनग्न स्थितीत हात जोडलेले फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे लोकांमध्येही या चॅलेंजचे आकर्षण वाढू लागले आहे. अनेकांनी असे फोटो शेअर करत मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. मोदी सरकारने कोरोना लस सर्वांसाठी मोफत देण्याची घोषणा केल्यानंतर भाजपकडून अशाचप्रकारे मोदींचे आभार मानणारी मोहिम सुरू केली होती. त्याच मोहिमेवरून नेटकऱ्यांनी ही मोहिम हाती केल्याचे दिसते.

दरम्यान, देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Petrol) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी नवीन पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी तेल उत्पादक देशांची संघटना 'ओपेक'शी (OPEC) चर्चा केली होती. या चर्चेनंतर 'ओपेक'ने तेलाचा पुरवठा आंतरराष्ट्रीय बाजारात वाढवण्याचा निर्णय घेतला असून, खनिज तेलाचे भाव कमी होण्यास सुरवात झाली आहे. ऑगस्टपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. 

 

भारताचा हा खनिज तेलाचा जगातील मोठा आयातदार देश आहे. खनिज तेलाच्या दरवाढीचा भारताला मोठा फटका बसत आहे. तेल उत्पादक देशांची संघटना 'ओपेक'शी पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी वाढत्या भावाबद्दल चर्चा केली होती. याचबरोबर त्यांनी याविषयी संघटनेकडे चिंता व्यक्त केली होती. 'ओपेक'च्या प्रमुख सदस्य देशांशी फोनवरुन चर्चा करुन रास्त भावाने खनिज तेलाचा पुरवठा व्हावा, यासाठी पुरी यांनी मोहीम उघडली होती. 

Image

पेट्रोलियम मंत्र्यांनी सुरू केलेल्या या मोहिमेमुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार आहे. 'ओपेक'ने तेल उत्पादन प्रतिदिन 4 लाख बॅरलने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट ते डिसेंबर या काळात ही उत्पादन वाढ असेल. याचबरोबर संयुक्त अरब अमिराती, इराक आणि कुवेत या महत्वाच्या तेल पुरवठादार देशांनी भारताला जादा तेलपुरवठा करण्याचे मान्य केले आहे. तेल उत्पादक देशांनी पुरवठा वाढवण्याचा निर्णय घेतल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावात घसरण सुरू झाली आहे. यामुळे ऑगस्टपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख