आरक्षणाबाबतची मोठी बातमी  : पदोन्नतीत आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती - Thackeray sarkar takes back decision about cancellation of reservation in Promotion  | Politics Marathi News - Sarkarnama

आरक्षणाबाबतची मोठी बातमी  : पदोन्नतीत आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 मे 2021

महाविकास आघाडी सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले.

मुंबई : पद्दोन्नतीतील आरक्षण (reservation in promotion) रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.  महाविकास आघाडी सरकारने 7 मे रोजी जीआर प्रसिद्ध करीत पदोन्नतीत आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता या निर्णयाला तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. यावरून आरक्षित वर्गात नाराजीचे सूर उमटले होते.  त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले. Thackeray sarkar takes back decision about cancellation of reservation in Promotion 

पदोन्नती आरक्षण रद्द केल्याने ठाकरे सरकारवर चहूबाजूंनी टीका होत होती. याशिवाय काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही पदोन्नीतील आरक्षणावरुन आक्रमक पवित्रा घेतला होता. आज झालेल्या उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.  पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयामुळे बराच वाद झाला होता. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय स्थगित करण्यात आला.  या निर्णयावरुन राज्य सरकारवर टीका होत होती. 

मोदी फक्त गुजरातचेच पंतप्रधान आहेत का? नाना पटोलेंचा सवाल.

नितीन राऊत यांनी आजच्या बैठकीत आरक्षण रद्द करण्याच्या निर्णया विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. मंत्रिमंडळ उपसमितीत चर्चा न करता 7 मे रोजी जीआर काढण्यात आल्याचा आरोप नितीन राऊत यांनी केला होता. त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याने या जीआरची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

25 मे 2004च्या सेवा ज्येष्ठतेच्या स्थितीनुसार रिक्त जागा भरण्यात येतील असं सरकारने म्हटलं होतं. पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय जो निर्णय घेईल त्यानुसार मागासवर्गीय प्रवर्गातील आरक्षणाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं राज्य सरकारने जीआरमध्ये म्हटलं होतं.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख