ठाकरे, पवार महाराष्ट्राचे ब्रॅंड...? आठवलेंनी दिले मिश्‍किल उत्तर ! 

शर्मा यांच्या कांदिवली पूर्वमधील ठाकूर कॉम्प्लेक्‍समधील निवासस्थानी आठवले यांनी भेट देऊन त्यांच्याप्रकृतीची चौकशी केली.
Thackeray, Pawar Maharashtra's brand ...? Athavale gave a mischievous answer!
Thackeray, Pawar Maharashtra's brand ...? Athavale gave a mischievous answer!

मुंबई : उद्धव आणि राज ठाकरे; तसेच शरद पवार हे महाराष्ट्राचे ब्रॅण्ड आहेत का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आपण ही महाराष्ट्राचे ब्रॅंड आहोत, असे मिश्‍किल उत्तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले. त्याच वेळी शेजारी उभे असलेले निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनीही उत्स्फूर्तपणे आपणही आठवले यांचे फॅन असल्याचे म्हटले. 

निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. त्यात शर्मा हे जखमी झाले आहेत. या प्रकरणावरून राज्यात शनिवारपासून वादंग उठले आहे. खुद्द देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी फोन करून शर्मा यांच्या तब्येतची विचारपूस केली आहे. याच प्रकरणावरून भाजपने शिवसेनेविरोधात रान उठविले आहे. 

त्या पार्श्‍वभूमीवर शर्मा यांच्या कांदिवली पूर्वमधील ठाकूर कॉम्प्लेक्‍समधील निवासस्थानी आठवले यांनी भेट देऊन त्यांच्या  प्रकृतीची चौकशी केली. त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून उपचार करून घेण्याचा सल्ला आठवले यांनी दिला आहे. याच वेळी पत्रकारांनी विचारलेल्या वरील प्रश्‍नावर आठवले यांनी मिश्‍किलपणे उत्तर दिले आहे. 

शर्मा यांच्यावर झालेला हल्ला हा जीवघेणा हल्ला होता. त्या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्याने कलम 307; 326 प्रमाणे गुन्हा दाखल होणे आवश्‍यक होते. मात्र, तशी कारवाई न केल्यामुळे हल्लेखोरांना त्वरित जामीन मिळाला. त्याबाबत आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. 

निवृत्त नौदल अधिकारी यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा केंद्र सरकारकडून मिळवून देण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आपण प्रयत्न करणार असल्याचे आठवले म्हणाले. 

या वेळी आठवले म्हणाले की महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील वातावरण गढूळ झाले आहे. ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, तो सत्ताधारी शिवसेना पक्ष सूडबुद्धीने काम करीत आहे. निवृत्त नौदल अधिकारी शर्मा यांच्यावर शिवसेनेने हल्ला केला आणि त्या हल्ल्याचे समर्थनही केले आहे. 

या प्रकरणी पोलिसांनाही योग्य कारवाई केली नाही. हल्लेखोर जामीनावर बाहेर आहेत. कंगना रनौटलाही अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सूडबुद्धीने वागणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला बरखास्त केले पाहिजे, अशी मागणी पुढे येत आहे. हे राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागणीला माझा पाठिंबा आहे, त्यासाठी आपण केंद्रात प्रयत्न करणार आहे, असे आठवले यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com