सचिन वाझेमुळे सरकारचे तोंड काळे झाले, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : रामदास आठवले - Thackeray government should resign Ramdas Athavale | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

सचिन वाझेमुळे सरकारचे तोंड काळे झाले, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : रामदास आठवले

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 एप्रिल 2021

सरकारमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे.

पंढरपूर : ''महाविकास आघाडी सरकारच्या काळात सचिन वाझें सारख्या पोलिस अधिकाऱ्यांचे कृत्य हे आतंकवादी आणि नक्षलवादी कृत्यासारखे आहे. हा हजारो कोटी रुपयांचा विषय असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी,'' अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.  

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडेंच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. 'ज्या काय घटना घडत आहेत, त्यामुळे सरकारचे तोंड काळे झाले आहे. ठाकरे सरकारने राजीनामा द्यावा,' अशी मागणी आठवले यांनी केली आहे.   

 
आठवले म्हणाले की, सरकारमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे. इतर मंत्र्यांनीही माझ्याकडून पैसे मागितले असल्याचे सचिन वाझेंनी सांगितले आहे याची चैाकशी झाली पाहिजे.  ज्या मंत्र्यांवर आरोप आहे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. सचिन वाझे मुळे सरकराची बदनामी झाली असून ठाकरे सरकारचे तोंड काळे झाले आहे. या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे.  

हेही वाचा : आमदार सदाभाऊ खोतांनी केला ठाकरे सरकारचा निषेध 

इस्लामपूर (सांगली) : राष्ट्रीय नाभिक संघटना व रयत क्रांती संघटना  यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील नाभिक बांधवांच्या व्यथा सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी सलून पार्लर समोर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर (ता. वाळवा जि. सांगली) येथे मागण्यांचे फलक हातात धरून घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख