ठाकरे सरकार, "मराठवाडयाला सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, विशेष पॅकेज द्या..." - Thackeray government, declare Marathwada a total wet drought  give a special package  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

ठाकरे सरकार, "मराठवाडयाला सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, विशेष पॅकेज द्या..."

सरकारनामा ब्युरो
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

मराठवाडयाला सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून विशेष पॅकेज देण्याची भुमिका घ्यावी, अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा ठाकुर यांनी परभणी येथे केली.

परभणी : काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या पक्षाचे सरकार असताना अनेकदा मराठवाड्याला मुख्यमंत्रीपद देऊन ही मराठवाड्याला भकासवाड बनवण्याचे पाप सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीने केले आहे. यामुळे किमान उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या सरकारने तरी मराठवाड्यासोबत सावत्रपणाची वागणूक देऊ नये. मराठवाडयाला सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून विशेष पॅकेज देण्याची भुमिका घ्यावी, अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा ठाकुर यांनी परभणी येथे केली. 

मराठवाडा अध्यक्ष अशोक  हिंगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणा बाबत आपण आग्रही आहे. वंचित बहुजन आघडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. मराठवाडास्तरीय बैठकीच्या वेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या वेळी प्रदेश प्रवक्ते फारूक अहमद, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, प्रा डॉ. सुरेश शेळके, उपाध्यक्ष केशव मुदेवाड व मराठवाडा कार्यकारीणीसह सर्व जिल्यातील प्रमुख पदाधीकारी उपस्थित होते.

रेखा ठाकुर म्हणाल्या की, गेल्या तीस  चाळीस वर्षात मराठवाड्याकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष आहे. मराठवाडा हे सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचे केंद्र बनले आहे. औद्योगिक वसाहती ओसाड पडल्यामुळे बेरोजगारीचा भस्मासुर प्रचंड वाढला आहे व निकृष्ट दर्जाच्या शिक्षणामुळे मुंबई पुण्यात सुध्दा नोकऱ्या मिळत नसल्यामुळे मराठवाड्यातील तरुणांचे भवितव्य अंधारमय झाले आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळाच्या सावलीत सततच्या नापिकीमुळे मराठवाड्यातील शेती व शेतकरी संपत असताना सरकारकडून दुजाभाव करत न्यायीक नुकसान भरपाई ही मिळत नाही व पिक विम्याचा लाभ शेतक-यांऐवजी विमा कंपन्यांना मिळवून देण्यात सरकार मग्न आहे. 

मराठवाड्यातील समस्यांवर राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी औरंगाबाद येथे होणारी एक दिवसीय मंत्रीमंडळाची बैठक सुध्दा अनेक वर्षापासून घेण्यात आली नाही, वैधानिक विकास मंडळाला ऐतिहासिक बाब बनवण्याचे पाप सरकारकडून होत आहे. या सर्व भेदभावांना दूर करणे, मुख्यमंत्र्यानी मराठवाड्यावर होणारा अन्याय दुर करीत मराठवाड्यातील शेतक-यांना दिवाळीपूर्वी सरसकट नुकसान भरपाई व पिक विम्याची रक्कम द्यावी. अन्यथा विभागीय स्तरावर तीव्र आंदोलन छेडण्याशिवाय वंचित बहुजन आघाडीकडे पर्याय राहणार नाही, असे रेखा ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख