ठाकरे सरकार प्रतिगामी व्हायला लागले आहे :  प्रकाश आंबेडकर - Thackeray government is becoming reactionary Prakash Ambedkar | Politics Marathi News - Sarkarnama

ठाकरे सरकार प्रतिगामी व्हायला लागले आहे :  प्रकाश आंबेडकर

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

महाराष्ट्र सरकारने बेभरवशावर न राहता निर्णय घेणारे राज्य म्हणून पुन्हा लौकिक मिळवावा.

पाटणा : "इतर राज्यांनी मंदीरे उघडली आहेत. पण अजूनही महाराष्ट्र सरकार मंदीरे उघडायला तयार नाहीत, अशी परिस्थिती आहे. इतर राज्यांनी आर्थिक व्यवस्था सुरू केली आहे. पण महाराष्ट्र सरकार याबाबत काहीही पावले उचलताना  दिसत नाहीत.

त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत बिकट होत चालली आहे. महाराष्ट्र सरकारने बेभरवशावर न राहता निर्णय घेणारे राज्य म्हणून पुन्हा लौकिक मिळवावा. महाराष्ट्राने पुरोगामी आणि निर्णय घेणारे राज्य पुन्हा उभं राहावं," अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली.

पुरोगामी असलेले महाराष्ट्र सरकार हे आता प्रतिगामी व्हायला लागले आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाउन उठविताना केंद्राने अनेक गाईड लाईन दिल्या पण महाराष्ट्र सरकार त्याला मान्यता द्यायला तयार नाही. सरकारचे आरोग्य सेतू अॅप आले, यातून तब्बेत कशी आहे हे कळते, कोरोना बाधित आहे की नाही हे कळते. महाराष्ट्र सरकाराने अजूनही लॅाकडाउन उठविला नाही, अशी परिस्थिती नाही, असे आंबेडकर यांनी नमूद केले आहे.   

हेही वाचा : अॅमेझॉन, फ्लिपकार्टला मनसेचा इशारा.. अॅपमध्ये मराठी भाषा समाविष्ट करा  

मुंबई : अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ड या दोन कंपन्यांनी सात दिवसाच्या आत जर त्यांनी त्यांच्या अॅपमध्ये मराठी भाषेचा अंतर्भाव केला नाही, तर त्यांचा मनसे स्टाइल समाचार घेण्यात येईल, असा इशारा मनसेले दिला आहे. ज्याप्रमाणे या कंपन्यांनी  दक्षिण भारतातल्या भाषांना प्राधान्य देऊन तिथे त्यांच्या भाषेत अॅप सुरू केले, तसेच महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीत अॅप आणावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचा दिवाळीचा सण मनसे स्टाईल साजरा करेल,  असा इशारा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ड या दोन कंपन्यांना सात दिवसाची मुदत देण्यात आली आहे. कामगार सेनेचे सचिन गोळे यांनी देखील अमेझॉनला माफी मागण्यास सांगितले होते. अॅपमध्ये मराठी भाषा समाविष्ट करण्यासाठी आठवड्याची मुदत देखील दिली आहे. अखिल चित्रे यांनी देखील अमेझॉन आणि फ्लिपकार्ट ला खळखट्याक चा इशारा दिला आहे
.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख