"पाण्यासाठी आमदारकी पणाला लावेन.." - Tembhu project released water into the Maan river mla Shahaji Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

"पाण्यासाठी आमदारकी पणाला लावेन.."

दत्तात्रय खंडागळे
शनिवार, 12 जून 2021

पाणी योजना पूर्ण करण्यासाठी मी आमदारकी पणाला लावेन, असे शहाजी पाटील यांनी सांगितले.

सांगोला (जि. सोलापूर) : सांगोला तालुक्याने यापूर्वी पाण्याचा दुष्काळ फार सोसला आहे. यापुढे तालुक्यातील माझ्या शेतकरी राजाला पाण्याचा दुष्काळ सोसावा लागणार नाही. तालुक्यातील अपूर्ण पाणी योजना पूर्ण करण्यासाठी मी आमदारकी पणाला लावेन. माण नदीमध्ये पाणी राहाण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहिल, असे शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील Shahaji Patil यांनी सांगितले. Tembhu project released water into the Maan river mla Shahaji Patil

टेंभू योजनेतून माणनदीमध्ये सोडलेल्या उन्हाळी आवर्तनाच्या पाण्याचे पूजन नुकतेच करण्यात आले. यावेळी आमदार शहाजी पाटील बोलत होते. या कार्यक्रमासाठी  माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, भाऊसाहेब रूपनर,  नगराध्यक्षा राणीताई माने, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबूराव गायकवाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी पाटील, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, शिवसेना तालुका प्रमुख सूर्यकांत घाडगे, किसान आर्मीचे प्रफुल्ल कदम, शिवसेनेचे शहर प्रमुख कमरुद्दीन खतीब, नगरसेवक छायाताई मेटकरी, शहाजी नलवडे, संजय देशमुख, जगदीश पाटील  उपस्थित होते 

  
सांगोला तालुका हा मागील अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत होता. इतिहासामध्ये प्रथम गेल्यावर्षी टेंभू योजनेचे पाणी उन्हाळी आवर्तनातून सांगोला तालुक्याला मिळाले. माण नदीवरील सर्व बंधारे भरून यशस्वीरीत्या गतवर्षीच्या आवर्तन पूर्ण झाले. टेंभू योजनेसह तालुक्यातील इतर योजनेचे पाणी तालुक्याला मिळवण्यासाठी माझा नेहमी प्रयत्न असेल असेही आमदार शहाजी पाटील यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांना पाणी देण्याच्या आश्वासनवरच मी आमदार झालो आहे. तालुक्यातील पाणी योजना पूर्ण करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असेन. तालुक्यातील सर्व राजकारण्यांना सोबत घेऊन अपूर्ण पाणी योजना पूर्ण करणे हेच माझे प्रथम ध्येय आहे 
शहाजी पाटील, आमदार, सांगोला.

याही वर्षी माण नदीमध्ये टेंभू योजनेचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार शहाजी पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत तात्काळ मुख्यमंत्र्यांकडून आदेश झाले. पाणी माणनदी मध्ये दाखल झाले होते. आटपाडी तलावातून हे पाणी बलवडी बंधाऱ्यामध्ये टाकून बलवडी बंधाऱ्यापासून मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे पाण्याने भरून घेण्यात आले आहेत.
 
या सोडण्यात आलेल्या पाण्याचा फायदा सांगोला तालुक्यातील  बलवडी, वझरे, चिणके, अनकडाळ, वाटंबरे, कमलापूर, वासुद, अकोला, कडलास, वाढेगाव, बामणी, सावे, मांजरी, देवळे, मेथवडे या गावांसह आजूबाजूच्या पंधरा ते वीस गावांना फायदा होत असल्याने शेतकऱ्यांच्या मध्ये समाधानाचे वातावरण आहे.
Edited by : Mangesh Mahale
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख