शिक्षक मतदारसंघ : निवडणूक आयोगाकडे अपक्ष उमेदवाराची तक्रार...

पहिल्यांदा राजकीय पक्षांचा हस्तक्षेप मोठा वाढल्याचे पुणे शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रकाश पवार यांनी सांगितले.
02Pune_20Graduate_20Constituency - Copy.jpg
02Pune_20Graduate_20Constituency - Copy.jpg

पिंपरी : "शिक्षण संस्थाचालकांच्या हस्तक्षेपामुळे शिक्षक मतदारसंघातील निवडणूक ही 'फ्री अँड फेअर' होऊ शकली नाही," असा दावा या निवडणुकीतील एका अपक्ष उमेदवारानेच केला आहे. तशी तक्रारच त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

या निवडणुकीवर स्वतःचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न करण्यासाठी शिक्षण संस्थांनी (काही अपवाद) शिक्षकांच्या स्वतंत्र मीटिंग घेऊन यानांच मते द्या, असा सूचनावजा धमकी आदेश काढला होता. विधिमंडळात राजकीय बलाबल वाढावं या हेतूने संस्थाचालक आणि राजकीय पक्ष यांच्या युतीतून लढणारा प्रवाह यावेळी अधिक ठळकपणे जाणवला. पहिल्यांदा राजकीय पक्षांचा हस्तक्षेप मोठा वाढल्याचे पुणे शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आणि पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रकाश पवार यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

ही निवडणूक लढवत असताना अनेक गंभीर गोष्टी निदर्शनास आल्याचे सांगून पवार म्हणाले, 'शिक्षक या निवडणुकीकडे तेवढं गांभीर्याने पाहताना दिसले नाहीत. शिक्षक संघटनांही जबाबदारीने जबाबदारीने सहभागी झाल्या नाहीत. ऑक्टोबर 2019 ला विधानसभेवर चंद्रकांतदादा पाटील निवडून गेल्यानंतर त्यांची रिक्त जागा सहा महिन्याच्या आत भरणे आवश्यक होती. फेब्रुवारी 20 पूर्वी ही निवडणूक होणे अपेक्षित होते. कोविडपूर्वी हे शक्य होतं. पण, आयोगाने तसे केले नाही. तसे केले असते, तर पदवी आणि शिक्षकच्या वेगवेगळ्या निवडणुका होऊन शिक्षकमधील थेट राजकीय हस्तक्षेप कमी झाला असता." 

"शिक्षकांनाही आपल्या आवडीप्रमाणे उमेदवार निवडण्याची संधी मिळाली असती. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुद्धा मतदार याद्या तयार नव्हत्या. निवडणूक प्रचाराला, तर वेळच मिळाला नाही. खूप इच्छा असूनही मतदारांना थेट भेटता आलं नाही. करोनामुळे सगळेच जीव मुठीत घेऊन प्रचार करत होते. त्यामुळे सगळ्यांचा प्रचार सोशल मीडियावर झाला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या कारणासाठी घटनाकारांनी हे मतदार संघ निर्माण केले त्याची पूर्तताच होताना दिसत नाही. संस्थाचालक आणि राजकीय पक्ष यांच्या दावणीतून शिक्षकांची सुटका करणे आणि शिक्षकांचे खरं प्रतिनिधी सभागृहात पाठवणे गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीतील मतदारांची उदासीनता कशी दूर करता येईल यावर काम झालं पाहिजे," असे पवार यांनी सांगितले. 

हेही वाचा : पहिला निकाल भाजपच्या बाजूने..अमरीश पटेल विजयी 
 
धुळे : विधानपरिषदेच्या धुळे -नंदुरबार पोटनिवडणुकीत  काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अमरीश पटेल हे विजयी झाले आहेत. येत्या काही तासात अधिकृत निकाल स्पष्ट होणार आहे. विधानपरिषदेच्या धुळे -नंदुरबार पोटनिवडणुकीसाठी 99 टक्के मतदान झाले आहे. धुळे-नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपचं संख्याबळ पाहता भाजपचं पारडं जड असल्यानं भाजपचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास भाजपाच्या गोटातून व्यक्त करण्याता आला आहे. भाजपमध्ये आलेल्या अमरीश पटेल यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com