कोरोनाची तिसरी लाट येणार पण कधी? टास्क फोर्सने दिले स्पष्टीकरण  

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची भीती असल्याने त्यादृष्टीने तयारी केली जात आहे.
 Covid-19 .jpg
Covid-19 .jpg

मुंबई : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेत (Second Wave) आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. आता तिसरी लाट (Third Wave) पुढील दोन ते चार आठवड्यांत येणार असल्याचा अंदाज राज्याच्या टास्क फोर्सने व्यक्त केल्याचे समोर आले होते. मात्र, असा कोणत्याही प्रकारचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही, असे टास्क फोर्सने म्हटले आहे.  (The task force gave an explanation from the third wave of the corona)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आरोग्य विभागाला तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी करण्याचे आदेशही दिले आहेत. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची भीती असल्याने त्यादृष्टीने तयारी केली जात आहे. कोरोनाची तिसरी लाट नेमकी कधी येणार यावरुन सध्या अनेक शक्यता व्यक्त होत आहे. महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर राहुल पंडित यांनी एका वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, महाराष्ट्रात पुढील दोन ते चार आठवड्यात तिसरी लाट येण्यासंबंधीचा कोणताही इशारा नसल्याचे सांगितले आहे. यावेळी त्यांनी तिसरी लाट लवकर आल्यास आपण तयार असले पाहिजे असेही म्हटले आहे.

दोन ते तीन आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येत असल्याचे सांगून तुम्ही लोकांना घाबरवत आहात का? तुमच्याकडे पुरावे आहेत का? असा प्रश्न पंडित यांना विचारण्यात आला होता. त्यावर पंडित म्हणाले, आम्ही लोकांना घाबरवण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही. मी हे योग्य पद्धतीने मांडतो. आमच्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीसंबंधी चर्चा झाली. आतापर्यंतच्या मॉडेलनुसार, दोन लाटांमध्ये १०० ते १२० दिवसांचे अंतर आहे. पण हे फक्त मॉडेल असून आपल्याला खरी परिस्थिती पहावी लागणार आहे, असल्याचे त्यांनी सांगितले. 

अमेरिकेमध्ये दोन लाटांमध्ये १४ ते १५ आठवड्यांचे अंतर आहे. पण युकेमध्ये आठ आठड्यांपेक्षा कमी अंतर आहे. आपल्याकडे डेल्टा विषाणू असल्याने तयारीत राहण्याची गरज आहे. आम्ही कधीही दोन ते चार आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे म्हटलेले नाही. असा अंदाज बांधणे कठीण आहे, असे त्यांनी सांगितले. 

जगभरातील इतर देशांचा अभ्यास करुन इतर लाटा कशा असतील याचा अंदाज घ्यावा लागणार आहे. यासंबंधीच पूर्ण चर्चा झाली होती. लाट लवकर आल्यास आपण तयारीत राहिले पाहिजे इतकीच चर्चा झाली असल्याचे ते म्हणाले. तिसऱ्या लाटेसाटी कोणतीही अशी वेळमर्यादा नाही. मात्र आपण सर्वांना कोरोनासंबंधित सुरक्षेच्या नियमांचे पालन केले पाहिजे. अर्थव्यवस्था सुरु होऊ नये असे माझे म्हणणे नाही. पण लोकांनी घराबाहेर पडताना डबल मास्क वापरला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.  
Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com