मुंबई : हिंदु-देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप झाल्यानंतर ‘तांडव’ या वेबसीरीजे निर्माते, कलाकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेता सैफ अली खान याची ‘तांडव’ ही वेबसीरीज अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर शुक्रवारी रिलीज झाली आहे. समाज माध्यमांवर या वेबसीरीजबाबत वाद निर्माण झाला आहे. भाजपचे खासदार मनोज कोटक यांच्यानंतर भाजपचे नेते राम कदम यांनी या वेबसीरीजविरोधात आवाज उठविला आहे. राम कदम यांनी घाटकोपर पोलिस ठाण्यात याबाबत काल तक्रार दाखल केली होती.
सकाळी झाली मतमोजणीला सुरुवात#राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNewshttps://t.co/8mIl6QA4tD
— Sarkarnama (@SarkarnamaNews) January 18, 2021
खासदार मनोज कोटक सुध्दा मालिकेचे निर्माते, कलाकार यांच्याविरोधात तक्रार केली आहे. ‘तांडव’मध्ये हिंदु-देवदेवतांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप राम कदम आणि मनोज कोटक यांनी केला आहे. कदम यांनी या मालिकेच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या वेबसीरीजमधील कलाकार, व निर्मात्यांवर कारवाई करावी, अशी मागणी कदम यांनी घाटकोपर पोलिसांकडे केली होती. भगवान शिवशंकर आणि श्रीराम यांच्यावर टिपण्णी करण्यात आली असल्याचे कदम यांनी तक्रारीत म्हटले आहे.
खासदार मनोज कोटक यांनी केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावड़ेकर यांच्याकडे या मालिकेबाबत तक्रार केली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या मालिकासाठी सेन्सासशीप असावी, अशी मागणी कोटक यांनी जावडेकर यांच्याकडे केली आहे. राजकारणावर आधारीत ‘तांडव’ मध्ये सैफ अली खान प्रमुख भुमिका आहे. तर अली अब्बास यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.
‘तांडव’ या वेबसीरीजे निर्माते हिमांशू कृष्ण मेहरा, दिग्दर्शक अली अब्बास जाफर, लेखक गौरव सोलंकी यांच्यासह ज्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसीरीज प्रदर्शित झाली आहे त्या अॅमेझॉन प्राइमच्या भारतातील ओरिजनल कटेंन्ट हेड अपर्णा पुरोहित यांच्याविरोधात लखनऊच्या हजरतगंज कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा : पश्चिम बंगालमध्ये शिवसेना निवडणूक लढविणार...
मुंबई : "शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढविणार," असे शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज सांगितले. ते पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्यांचा आंदोलनाबाबत राऊत म्हणाले की शेती विषयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे जाणकार आहेत, केंद्र सरकारने त्यांचा सल्ला घ्यावा.

