विश्लेषण : दक्षिणेत लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही मोदी फॅक्टर निष्प्रभ

लोकसभा निवडणुकीत धडा घेतल्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपशी आघाडी करण्यात अनेक नेते अनुत्सुक होते.
Tamilnadu election Prime Minister Modis influence has not been seen
Tamilnadu election Prime Minister Modis influence has not been seen

चेन्नई : कर्नाटक वगळता दक्षिण भारतातील इतर राज्यांमध्ये सत्ता मिळवण्यात भाजपला अद्यापही यश आलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही तमिळनाडू व केरळमध्ये जोरदार प्रचार केला होता. पण त्याचा काहीही परिणाम येथील मतदारांवर झाल्याचे दिसत नाही. मोदी फॅक्टर या निवडणुकीतही चालल्याचे दिसत नाही.

तमिळनाडूमध्ये 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत डीएमके व काँग्रेस आघाडीला 38 पैकी 37 जागा मिळाल्या होत्या. अण्णाद्रमुकला 2014 मध्ये 37 जागांवर विजय मिळाला होता. 2019 च्या निवडणुकीत अण्णाद्रमुकने भाजपशी आघाडी केली होती. त्याचाच फटका 2019 च्या निवडणुकीत बसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत होते. भाजपशी आघाडी केल्याने मुस्लिम व ख्रिश्चन मते अण्णाद्रमुकपासून दुरावल्याचा दावा त्यांनी केला होता.

लोकसभा निवडणुकीत धडा घेतल्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपशी आघाडी करण्यात अनेक नेते अनुत्सुक होते. पण शशिकला यांच्या बंडाचा फटका बसू नये म्हणून भाजपशी आघाडी केल्याचे बोलले जाते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा फायदाही पक्षाला घ्यायचा होता. त्यानुसार पंतप्रधान मोदींच्या अनेक सभा तमिळनाडूत झाल्या. पण या निवडणुकीतलही मोदी फॅक्टर चालला नाही. त्यामुळे डीएमकेने सुरूवातीच्या कलांमध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे.

केरळमध्येही हीच स्थिती असून भाजपला जेमतेम दोन जागांवर आघाडी आहे. पंतप्रधान मोदी यांनी केरळमध्येही सभा घेतल्या होत्या. पण इथेही त्यांचा फारसा प्रभाव पडल्याचे दिसत नाही. मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी आवश्यक जागांवर मजबूत आघाडी घेतली आहे. 

दरम्यान, तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या एकूण 234 जागा आहेत. तर बहुमतासाठी 118 हा जादुई आकडा आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार द्रमुकने बहुमताचा आकडा पार करत मोठी आघाडी घेतली आहे. द्रमुकला 130 हून अधिक जागांवर आघाडी मिळाली असून अण्णाद्रमुकला अद्याप 90 चा आकडाही गाठता आलेला नाही.

पुदुच्चेरीत भाजप आघाडीची सत्तेच्या दिशेने वाटचाल

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीमध्ये भाजप आघाडीने सत्ता मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. एकूण 30 विधानसभा मतदारसंघांपैकी 16 जागांवर भाजप आघाडीने सध्या आघाडी मिळवली आहे. तर केवळ 9 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. त्यामुळे या राज्यांत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यात भाजपला यश मिळणार आहे. तर कर्नाटकनंतर दक्षिणेतील आणखी एका राज्यात भाजप सत्ता काबीज करणार आहे. 

पुदुच्चेरीमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बहुमत गेल्याने काँग्रेसला सत्ता सोडावी लागली. त्यामुळे काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य निसटले. पुदुच्चेरीमध्ये 30 जागांसाठी निवडणुक झाली आहे. राज्यात तीन नामनिर्देशित सदस्य असतात. 2016 मध्ये काँग्रेसने 19 जागा जिंकल्या होत्या. तर एआयएडीएमके व एनआर काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी 4 जागा मिळाल्या होत्या. 

भाजपचे तीन नामनिर्देशित सदस्य आहेत. एक्झिट पोलनुसार, पुदुच्चेरीत एनआर काँग्रेस-भाजप आघाडीला विजय मिळेल. या आघाडीला 18 जागा मिळतील. काँग्रेस आघाडीला 12 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यानुसार सुरूवातीच्या मतमोजणीच्या कलांनुसार भाजप आघाडीला आतापर्यंत 16 जागांवर आघाडी मिळाली आहे. या राज्यात एनआर काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता असून याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com