अंगावर पाच किलो सोनं घालून उमेदवार आला निवडणुकीचा अर्ज भरायला

सोन्याच्या दागिन्यांची किंमत ४ कोटी ७३ लाख रुपये एवढी आहे.
Tamilnadu Assembly election Independent candidate Hari Nadar declared that he owns 11,200 grams of gold
Tamilnadu Assembly election Independent candidate Hari Nadar declared that he owns 11,200 grams of gold

चेन्नई : कोणत्याही निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांच्याकडील संपत्तीबाबत लोकांना उत्सुकता असते. अनेकांकडे असलेल्या संपत्तीचे आकडे पाहून डोळे दिपून जातात. तर काहींच्या नावावर वाहनही नसते. देशातील पाच राज्यातही विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये काही उमेदवारांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

तमिळनाडूमध्ये हरी नाडर या अपक्ष उमेदवाराने अलंगुलम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते अंगावर पाच किलो सोनं घालून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयात आले होते. त्यांनी आपल्याकडे तब्बल ४ कोटी ७३ लाख रुपयांचे सोने असल्याचे जाहीर केले आहे. नाडर यांची ओळख उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून आहे. तसेच अंगावर अनेक तोळे सोनेचे दागिने घालत असल्याने त्यांची गोल्ड मॅन म्हणूनही त्यांना ओळखले जाते.

उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या माहितीनुसार, नाडर यांच्याकडे ११ किलो सोने आहे. त्यांच्याकडे सुमारे १२ कोटी ६१ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर ११ लाख ५० हजार रुपयांची स्थावर मालमत्ता त्यांच्या नावावर आहे. एक फॉर्च्यूनर, इनोव्हा क्रिस्टा, टेम्प ट्रॅव्हल, महिंद्रा एक्सयुव्ही, टाटा सफारी आणि बोलेरो या गाड्या त्यांच्याकडे आहेत. त्यांच्यावर १५ फौजदारी गुन्हे दाखल असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. 

नाडर हे ३९ वर्षांचे आहेत. सोन्याविषयी खूप आधीपासूनच आकर्षण आहे. आपण आपल्या कमाईच्या पैशातून सोन्याचे दागिने खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. ट्रॅव्हल, रिअल इस्टेट, चित्रपटांना पैसे पुरवणे आदी व्यवसाय असल्याचे ते सांगतात. ब्रेसलेट, अंगठी, चैन किंवा सोन्याचे इतर दागिन्यांचे नवीन मॉडेल बाजार आल्यानंतर आपण ते लगेच खरेदी करत असल्याची माहितीही त्यांनी माध्यमांना दिली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नानगुणेरी मतदारसंघातून ते उभे राहिले होते. त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. 

कमल हसन सर्वात श्रीमंत उमेदवार

अभिनेता कमल हासन यांनी दक्षिण कोइंबतूर  मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी 45 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची जंगम मालमत्ता आपल्या शपथ पत्रात जाहीर केली आहे. कमल हासन यांनी शपथ पत्रात सांगितले आहे की, त्यांच्यावर 49 कोटी 50 लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांची जंगम मालमत्ता 45,09,01,476 कोटींची आहे. बीएमडब्ल्यू 730 एलडी आणि लेक्सस एलएक्स 570 या दोन वाहनांचा समावेश आहे, ज्यांची किंमत 3 कोटी 69 लाख रुपयांहून अधिक आहे. चेन्नईत त्यांच्या दोन निवासी इमारती आहेत. त्यांचे एकूण मूल्य 19.5 कोटी रुपये आहे. लंडनमधील अडीच कोटींच्या एकत्रित मालमत्तेची माहितीही त्यांनी दिली आहे.   

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com