प्रत्येक कुटूंबातील एकाला सरकारी नोकरी, वर्षाला सहा सिलेंडर अन् बरंच काही...

सत्ताधारी पक्षानेप्रसिध्द केलेल्या जाहीरनाम्यामध्येअनेक लोकप्रिय घोषणा केल्याआहेत.
Tamilnadu assembly election AIADMK manifesto promises govt job
Tamilnadu assembly election AIADMK manifesto promises govt job

चेन्नई : तमिळनाडूतील निवडणुका म्हटलं की सत्ताधारी पक्षाकडून अनेक लोकप्रिय घोषणा केल्या जातात. यंदाची विधानसभा निवडणुकही त्याला अपवाद ठरली नाही. सत्ताधारी अण्णाद्रमुकने प्रसिध्द केलेल्या जाहीरनाम्यामध्ये अशाच अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत.

अण्णाद्रमुकने तमिळनाडूतील प्रत्येक कुटूंबातील किमान एकाला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच राज्यात अम्मा हाऊसिंग स्कीम राबविली जाणार असून त्याअंतगर्त बेघर अशलेल्या प्रत्येकाला मोफत घर दिले जाईल. त्याचप्रमाणे दारिद्रय रेषेखालील कुटूंबांना मोफत वॉशिंग मशिन आणि सोलर स्टोव्ह, प्रत्येक कुटूंबाला मोफत केबल टीव्ही सेवा देण्याचे आश्वासनही पक्षाने दिले आहे. 

पक्षाने यापूर्वीच तेथील शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ केले आहे. आता त्यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज माफ करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच विद्यार्थ्यांना संपुर्ण वर्षभर २ जीबी इंटरनेट डाटा मोफत दिला जाईल. शहर बससेवेमध्ये महिलांना ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. वर्षभरात सहा सिलेंडर मोफत दिले जातील. तसेच महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये देण्याची योजनाही जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एडापल्ली के पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्या उपस्थितीत रविवारी जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला. मागील चार वर्षात सरकारने लोकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे लोक पक्षाच्या बाजूने उभे राहतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, तमिळनाडूमध्ये निवडणूक काळात यापूर्वीही अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत. दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी त्याला मोठे स्वरूप देत अनेक गोष्टी मोफत देण्याचा धडाका सुरू केला. त्याला कल्याणकारी योजनेचे रुप देण्यात आले. या घोषणांच्या माध्यमातूनच त्यांनी राज्यात सत्ता टिकवली होती. आताच्या सरकारनेही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकले आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com