तामिळनाडूमध्ये सत्तांतर अटळ.. द्रमुक-मित्रपक्ष  १३४ जागांवर आघाडी - tamil nadu assembly election २०२१- result live updates | Politics Marathi News - Sarkarnama

तामिळनाडूमध्ये सत्तांतर अटळ.. द्रमुक-मित्रपक्ष  १३४ जागांवर आघाडी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 मे 2021

मतदानाचा ट्रेंड द्रमुकच्या बाजूनेच असल्याचे स्पष्ट होत आहे.

चेन्नई : तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या २३४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. सुरवातीच्या तीन तासात द्रमुक आणि मित्रपक्षांनी १३४ जागांवर आघाडी घेतली आहे. तर विरोधी सत्ताधारी एआयडीएमके ९९ जागांवर आघाडीवर आहे. 

आत्तापर्यंतचा कैाल पाहता तामिळनाडूमध्ये सत्तांतर अटळ आहे. द्रमुकची सत्ता येईल, असे सध्याचे चित्र आहे. मतदानाचा ट्रेंड द्रमुकच्या बाजूनेच असल्याचे स्पष्ट होत आहे. कमल हासन यांच्या मक्कल निधी मय्यम हा पक्ष एका जागेवर आघाडीवर आहे. अभिनेता कमल हासन यांचा मक्कल निधी मय्यम हा पक्ष ४३ जागा लढवत आहे.  अजून आघाडीचे आकडे बदलत आहेत, एकही उमेदवार विजयी झालेला नाही. 

तमिळनाडूत सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि भाजपची आघाडी आहे. या विरोधात द्रमुक आणि काँग्रेसची आघाडी आहे. माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांनी राजकारणासह सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली आहे. द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांच्या नावाला मुख्यमंत्रिपदासाठी पसंती मिळण्याची चिन्हे आहेत. 
 
हेही वाचा : दक्षिणेत भाजप आणखी एका राज्यात सत्ता काबीज करणार
 
पुदुच्चेरी : केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीमध्ये भाजप आघाडीने सत्ता मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. एकूण 30 विधानसभा मतदारसंघांपैकी 16 जागांवर भाजप आघाडीने सध्या आघाडी मिळवली आहे. तर केवळ 9 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. त्यामुळे या राज्यांत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यात भाजपला यश मिळणार आहे. तर कर्नाटकनंतर दक्षिणेतील आणखी एका राज्यात भाजप सत्ता काबीज करणार आहे. पुदुच्चेरीमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बहुमत गेल्याने काँग्रेसला सत्ता सोडावी लागली. त्यामुळे काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य निसटले. पुदुच्चेरीमध्ये 30 जागांसाठी निवडणुक झाली आहे. राज्यात तीन नामनिर्देशित सदस्य असतात. 2016 मध्ये काँग्रेसने 19 जागा जिंकल्या होत्या. तर एआयएडीएमके व एनआर काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी 4 जागा मिळाल्या होत्या.  भाजपचे तीन नामनिर्देशित सदस्य आहेत. एक्झिट पोलनुसार, पुदुच्चेरीत एनआर काँग्रेस-भाजप आघाडीला विजय मिळेल. या आघाडीला 18 जागा मिळतील. काँग्रेस आघाडीला 12 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यानुसार सुरूवातीच्या मतमोजणीच्या कलांनुसार भाजप आघाडीला आतापर्यंत 16 जागांवर आघाडी मिळाली आहे. या राज्यात एनआर काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता असून याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख