अलमट्टीतून विसर्गाबाबत कर्नाटकशी तातडीने बोला : फडणविसांची सूचना

फडणवीस यांचे केंद्राशीही झाले बोलणे..
अलमट्टीतून विसर्गाबाबत कर्नाटकशी तातडीने बोला : फडणविसांची सूचना
devendra fadnavis

मुंबई : कोल्हापूर, सांगली भागातील पूरस्थिती नियंत्रणात (Flood in Kolhapur) आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटक सरकारकडे (Karnatak) पाठपुरावा करून समन्वय साधला पाहिजे,असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारला ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र विशेषतः: कोकणातील महाडनजीक घडलेल्या घटना पाहता तातडीची मदत करावी. तसेच नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत द्यायला हवी. पिण्याचे पाणी, अन्न, कोरोनाचा कालखंड पाहता आरोग्य सुविधा या बाबी प्राधान्यक्रमात असल्याच पाहिजेत, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागात सातत्याने येणारी संकटे पाहता दूरगामी विचार राज्य सरकारने करण्याची गरज आहे. तळिये या गावात घरे नव्याने पण सुरक्षित ठिकाणी बांधून सर्व नागरी सुविधा नागरिकांना निर्माण करून द्याव्यात. असे करताना धोकादायक क्षेत्राबाहेर हे पुनर्वसन असावे, अशी सूचना त्यांनी केली.

स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा हवी
कोकणाची भौगोलिक स्थिती आणि सातत्याने येणारी संकटे पाहता कोकणासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करावी. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही फडणवीस यांनी ट्विटमधून केली.

कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील ९ जिल्हे अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित

७६ मृत्यू; सुमारे ९० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

एनडीआरएफ, लष्कराच्या मदतीने बचाव कार्यास वेग

------

मदत व पुनर्वसन विभागाकडून पूर परिस्थिती व मदत आणि बचाव कार्याची माहिती.

बाधित जिल्हे : एकूण ९

कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, ठाणे

एकूण बाधित गावे : ८९०

एकूण मृत्यू : ७६

हरविलेल्या व्यक्ती : ५९

जखमी व्यक्ती : ३८

पूर्ण नुकसान झालेली घरे: १६

अंशतः: नुकसान झालेली घरे: ६

प्राण्यांचे मृत्यू : ७५

सुरक्षित स्थळी हलविलेल्या व्यक्ती: ९० हजार

मदत छावण्या : ४

निवारा केंद्रे : रत्नागिरी ६ ( २ हजार लोक)

सुविधांचे नुकसान : चिपळूण येथे वशिष्टी नदीवरील पूल खचला

लष्कर, एनडीआरएफ सहाय्य

· एनडीआरएफच्या एकूण २५ तुकड्या ;

(मुंबई २, पालघर १, ठाणे २, रायगड १, रत्नागिरी ६, सिंधुदुर्ग २, सांगली २, सातारा ३. कोल्हापूर ४, पुणे २ )

· भुवनेश्वरहून मागविल्या ८ तुकड्या -

या कोल्हापूर २, सातारा १, सांगली २ इथे तैनात केल्या जातील, तसेच २ तुकड्या पुणे येथे राखीव असतील.

 तटरक्षक दलाच्या ३ , नौदलाच्या ७, लष्कराच्या ३ तुकड्या कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड येथे

· एसडीआरएफच्या नागपूरसाठी २ आणि या रायगड जिल्ह्यासाठी २ अशा ४ तुकड्या

· बोटी : ५९ ( ४८ एनडीआरएफ आणि ११ एसडीआरएफ)

महाड येथील परिस्थिती :

अतिवृष्टीमुळे सावित्री नदीचे पाणी वाढून महाड आणि पोलादपूर येथे पूर आला.

सावित्री नदीवरील पूल मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेल्याने बचाव पथकांना वेळीच पोहोचणे अवघड झाले.

एनडीआरएफच्या जवानांना हवाईमार्गे दुर्घटनास्थळी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र सुरुवातीला अतिशय खराब हवामानामुळे ते उतरू शकले नाहीत, मात्र नंतर त्यांनी बचाव कार्य सुरु केले आणि माणगाव येथे बचाव केंद्रे सुरु करण्यात आली.

३ ठिकाणी दरडी कोसळल्या

तळीये मधलीवाडी (ता. महाड)

साखरसुतारवाडी

केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर)

२ कोटी रुपये निधी

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तातडीची मदत म्हणून २ कोटी रुपये देण्यात आले असून पाउस आणि पाणी ओसरल्याने मदत कार्यास वेग देण्यात आला आहे.

१००० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in