'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांचे सोयाबीन पेटविले...  - Swabhimani leader Ravikant Tupkar  soybeans were set on fire | Politics Marathi News - Sarkarnama

'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांचे सोयाबीन पेटविले... 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

रविकांत तुपकर यांच्या शेतातील कापून ठेवलेल जवळपास 70 ते 75 क्विंटल सोयाबीनच्या सुडीला अज्ञाताने आग लावून दिली.
 

बुलढाणा  : अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांना तड़ाखा दिल्यानंतर आता काढण्यात आलेल्या सोयाबीन सुड़या ना आग लावून जाळण्याच्या घटना समोर येत आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांच्या बुलढाणा जिल्हयातील सावळा येथील शेतातील कापून ठेवलेल जवळपास 70 ते 75 क्विंटल सोयाबीनच्या सुडीला अज्ञाताने आग लावून दिली.
 
या आगीत तुपकर याचा संपूर्ण  सोयाबीन जळून खाक झाला आहे.  याप्रकरणी रविकांत तुपकर यांनी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आता नुकसानीतून शेतकऱ्यांसाठी लढनारे नेते सुद्धा सूटत नाही या बद्दल शेतकरी संतप्त झाले आहेत.
 

हेही वाचा: संभाजी राजे म्हणाले, "सरकारकडून मागे ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होऊ नये..  

मुंबई : मराठा आरक्षणाची स्थगिती उठवण्याच्या प्रकरणावर 27 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. स्थगिती उठवण्याबाबत एक याचिका दाखल करण्यात आली आहे. मराठा समाजाचं या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे. याबाबत खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारला 'नव्या जोमाने बाजू मांडावी, संपूर्ण मराठा समाज याकामी आपल्या पाठीमागे उभा राहील,' असे सांगितले आहे.राज्यात काही दिवसात मराठा आरक्षणासंदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. मराठा समाजाचा याबाबत बैठकाही झाल्या आहेत. न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे.

याबाबत खासदार संभाजीराजे म्हणाले की आरक्षणाला जी तात्पुरती स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने दिली होती, तिचा पुनर्विचार करण्यासाठीची याचिका महाराष्ट्र शासन आणि समाजातील जागरूक बांधवांनी दाखल केली आहे. त्या संदर्भात सुनावणी होईल. ज्या न्यायमूर्तींनी स्थगिती दिली होती, पुन्हा त्यांच्याच बेंच समोर सुनावणी होणार आहे. मला आशा आहे, की न्यायदेवता न्याय करेल. मराठा समाज बांधवांचा गेल्या 40 वर्षांचा लढा सार्थकी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याच बरोबर, राज्य सरकारकडून मागे ज्या चुका झाल्या किंवा ज्या काही उणिवा राहिल्या त्या पुन्हा होऊ नये याची दक्षता घेण्याची गरज आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख