सुप्रिया सुळे यांचे  पदाधिकारी-कार्यकर्त्यांना  आवाहन...'रक्तदान शिबिरे घ्या..'' - Supriya Sule blood donation camps all over the state | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

सुप्रिया सुळे यांचे  पदाधिकारी-कार्यकर्त्यांना  आवाहन...'रक्तदान शिबिरे घ्या..''

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 एप्रिल 2021

खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असे आवाहन केले आहे. 

पुणे : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. विषाणूंचा वेगाने फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काही सूचनावजा आवाहन करणारे पत्र लिहिले आहे. या पत्राचा संदर्भ घेत खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असे आवाहन केले आहे. 

सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे.  हे लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपले आवाहन आहे की,  कृपया हा तुटवडा दूर करण्यासाठी राज्यात जेथे शक्य असेल, त्या त्या प्रत्येक ठिकाणी रक्तदान शिबिरे घ्यावीत. आपण एकमेकांना सहकार्य करुन परस्पर सहकार्य व सामंजस्याने एक समाज म्हणून या संकटाचा सामना करु. हे संकट दूर होऊन पुन्हा एकदा आपण नव्या क्षितिजाकडे झेपावू , असा मला ठाम विश्वास आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 

शरद पवार यांनी आपल्या पत्रात म्हटल्यानुसार सर्वांनी प्रशासकीय यंत्रणांनी वेळोवेळी जारी केलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन करावे. याशिवाय मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्यासोबतच सोशल डिस्टन्सिंगच्या तत्वाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही सुळे यांनी केले आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे गर्दी होणारे कोणतेही कार्यक्रम आपण सर्वांनीच कसोशीने टाळणे आवश्यक आहे. राज्यातील प्रशासन, आरोग्य यंत्रणा, डॉक्टर्स, परिचारिका व सपोर्टिंग स्टाफ आणि पोलीस यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अविश्रांत मेहनत घेत आहे. आपली सर्वांची साथ मिळाली तर कोरोनाचे हे संकट परतवून लावण्यात सर्वजण यशस्वी होऊ, असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी आवाहन केले आहे.

Edited by: Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख