Maratha reservation : स्थगिती उठणार की कायम राहणार..आज फैसला

आज मराठा आरक्षणावर सुनावणी सुरू होत आहे.
mr5.jpg
mr5.jpg

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठणार का कायम राहणार याबाबत आज निर्णय होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे आज मराठा आरक्षणावर सुनावणी सुरू होत आहे.  

न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेश्‍वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट, न्यायमूर्ती अब्दुल नजीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. मागची सुनावणी 20 जानेवारी रोजी झाली होती. तेव्हा सर्व पक्षकारांच्या वकिलांनी ऑनलाइन सुनावणी न घेता प्रत्यक्षात घेण्याची मागणी केली होती. यानंतर सुनावणीच्या पद्धतीवर दोन आठवड्यांत निर्णय देण्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. यामुळे आज 5 फेब्रुवारीला ही सुनावणी होत आहे. आजची सुनावणी ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच होण्याची शक्यता आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेऊ नये, असं राज्य सरकारचं मत आहे. 

मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिकच चिघळत चालला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशानंतर मराठा समाजात चिंतेचे वातावरण आहे. एकीकडे, महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल होताना पुरेपूर काळजी न घेतल्याचा आरोप विरोधकांकडून तसेच मराठा समाजातील नेत्यांकडून केला जात आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात 2018 मध्ये कायदा करून मराठा आरक्षण देण्यात आलं होतं. यानुसार, शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजासाठी 16 टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली होती. परंतु, या कायद्याला नंतर न्यायालयात आव्हान देण्यात आलं. मुंबई उच्च न्यायालयाने हा कायदा घटनेनुसारच आणल्याचं सांगत आरक्षण कायम ठेवलं; परंतु 16 टक्क्यांऐवजी कोटा कमी करण्याची सूचना दिली होती.

सध्या मराठा आरक्षण प्रश्नी सुप्रीम कोर्टात विविध अँप्लिकेशन दाखल आहेत. त्याची पुरेसी तयारी करण्यासाठी किमान 6 आठवड्यांचा कोर्टाने वेळ द्यावा अशी मागणी मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारची बाजू सुप्रीम कोर्टात मांडणारे वकील मुकुल रोहतगी यांनी तोंडी कोर्टाला केली होती. त्यानंतर कोर्टाने सुनावणी घ्यावी असं देखील म्हंटल होतं. त्यामुळे आज कोर्टाने मुकुल रोहतगी यांनी केलेल्या मागणीचा विचार करण्यासाठी सुनावणी घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com