सुप्रीम कोर्टानं सरकारला धारेवर धरले..लोकांचे जीव वाचायला हवेत.. कठोर पावले उचलायला भाग पाडू नका... - Supreme Court asked the central government supply of oxygen | Politics Marathi News - Sarkarnama

सुप्रीम कोर्टानं सरकारला धारेवर धरले..लोकांचे जीव वाचायला हवेत.. कठोर पावले उचलायला भाग पाडू नका...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 मे 2021

आम्हाला अधिक कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे.

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा oxygen पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याने आज सुप्रीम कोर्टानं Supreme Court केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले. तुम्ही आमचे हे आदेश पाळणार नसाल तर आम्हाला अधिक कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे. न्या. डी.वाय. चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. Supreme Court asked the central government supply of oxygen

कोणत्याही स्थितीमध्ये दिल्लीला सातशे मेट्रिक टन ऑक्सिजन मिळायलाच हवा. आमच्यासाठी काम होणे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारने आम्हाला अधिक कठोर निर्णय घ्यायला भाग पाडू नये. या पुरवठ्यामध्ये अनेक अडथळे दिसून येत आहेत, काही ठिकाणी कंटेनर नाहीत, बऱ्याच ठिकाणी वाहतुकीमध्ये देखील अडचणी येत आहेत, असे न्यायालयाने सांगितले.

माझ्यासह नेते, प्रशासनामध्ये संवेदना शिल्लक नाहीत..असे शरद बुट्टे पाटील का म्हणाले..

ऑक्सिजनचा पुरवठ्याबाबत उच्च न्यायालयाने  केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरताना त्यांच्याविरोधात न्यायालयीन अवमानाची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. केंद्राने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापुढे मांडले. अधिकाऱ्यांना तुरुंगामध्ये टाकून ऑक्सिजन मिळणार नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांचे जीव वाचायला हवेत असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले होते. आज या प्रकरणाची सुनावणी झाली. 

कोणत्याही स्थितीमध्ये सातशे मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणे गरजेचे आहे. आम्हाला या प्रकरणामध्ये कठोर पावले उचलायची नाहीत पण तसे करण्याला भाग पाडू नका. आमचे आदेश तीन वाजेपर्यंत संकेतस्थळावर अपलोड होतील पण तुम्ही ऑक्सिजनची तातडीने सोय करा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख