रतन टाटांना दिलासा; सायरस मिस्त्रींबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय...

सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या कार्यकारी अध्यक्ष पदावरून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे.
Supreme court approves tata groups decision of removal of cyrus mistry
Supreme court approves tata groups decision of removal of cyrus mistry

नवी दिल्ली : टाटा समुहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्रींना हटविणे योग्यच असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे मिस्त्री यांना जोरदार धक्का बसला असून टाटा समुहाला दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय कंपनी लवादाने डिसेंबर 2019 मध्ये मिस्त्री यांची हकालपट्टी बेकादेशीर असल्याचे म्हटले होते. हा निर्णय न्यायालयाने रद्द केला आहे.

सायरस मिस्त्री यांची अॉक्टोबर 2016 मध्ये टाटा सन्सच्या कार्यकारी अध्यक्ष पदावरून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली होती. मिस्त्री कुटुंबियांची टाटा सन्समध्ये 18.4 टक्के एवढी भागीदारी आहे. मिस्त्री यांनी या निर्णयाविरोधात राष्ट्रीय कंपनी विधी अपिलीय न्यायाधीकरणाकडे दाद मागितली होती. डिसेंबर 2019 मध्ये न्यायाधीकरणाने मिस्त्री यांना पुन्हा अध्यक्षपद बहाल करण्याचे आदेश दिले होते. 

न्यायाधीकरणाच्या या निर्णयाविरोधात टाटा समूहाकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांनीही वैयक्तिक याचिका दाखल करून मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीला आव्हान दिले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. मागील वर्षी 17 डिसेंबर रोजी न्यायालयाने हा निकाल राखून ठेवला होता. आज सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायाधीश, ए. एस. बोपण्णा आणि रामासुब्रमण्यमन यांच्या घटनापीठाने यांनी निकाल दिला. 

न्यायाधिकरणाने मिस्त्री यांना पुन्हा अध्यक्ष करण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द केला आहे. तसेच टाटा समूहाने मिस्त्री यांना हटविण्याचा घेतलेला निर्णयही न्यायालयाने योग्य ठरवला आहे. त्यामुळे मिस्त्री यांना धक्का बसला आहे. न्यायालयाने मिस्त्रींना टाटा सन्समधील शेअर्सशी संबंधित कोणतेही हस्तांतरण किंवा कोणतीही कार्यवाही न करण्याचा आदेशही दिला आहे. 

टाटा समूह आणि मिस्त्री यांच्यामधील वाद न्यायालयात असताना मिस्त्री यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. टाटा समूहाला 2019 मध्ये सुमारे तेराशे कोटींचा तोटा झालो होता. मागील अनेक वर्षांत पहिल्यांदाच एवढा तोटा होऊनही तो लपविण्यात आला, असा दावा मिस्त्री यांनी न्यायालयात केला होता. हा तोटा 282 टक्केने वाढला आहे. टाटा समूहाची कामगिरी खालावत चालल्याचेही मिस्त्री यांनीही सांगितले होते. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com