Supply of wheat, rice, salt to the poor of Madhya Pradesh at one rupee per kg! | Sarkarnama

मध्यप्रदेशातील गरीबांना एक रुपया किलोने गहू, तांदूळ, मिठाचा पुरवठा ! 

वृत्तसंस्था
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजने अंतर्गत प्रत्येक गरीब माणसाला कसे अन्न मिळेल याची खबरदारी सरकारने घेतली आहे

इंदूर : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येक गरीब माणसाला एक रुपयात गहू, मीठ आणि तांदूळ देण्यात येत आहे अशी माहिती मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी आज दिली आहे. 

कारोनाच्या संकटामुळे राज्यातील गरीबांसमोर मोठे संकट उभे राहिल होते. गेल्या तीन चार महिन्यापासून उद्योग व्यवसाय ठप्प आहेत. लोकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे राज्यातील गरीबांसमोर कसं जगायचं हे आव्हान होते. राज्यातील 37 लाख कुटुंबांना रेशन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजने अंतर्गत प्रत्येक गरीब माणसाला कसे अन्न मिळेल याची खबरदारी सरकारने घेतली आहे. प्रत्येक गरीब माणसाला गहू, तांदूळ आणि मीठ एक रुपया किलोने देण्यात देत आहे. अन्न सुरक्षा हक्काअंतर्गन हे वाटत करण्यात येत आहे आणि गरीबांचा तो हक्कच आहे असेही शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे. 

नुकतेच राज्यातील पावनेदोन लाख गरीब लोकांना स्वत:च्या हक्काचे घरही पंतप्रधान आवास योजेनेअतंर्गत देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिसीद्वारे स्वत:चे हक्काचे घर मिळालेल्या लोकांचे आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे अभिनंदनही केले होते. 

तसेच शिवराजसिंह सरकारने राज्यातील दोन लाख किरकोळ व्यापाऱ्यांनाही या सरकारने मदतीचा हात देऊ केला आहे. त्याचेही पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले होते. जे किरकोळ व्यापारी आहेत त्यांना सरकारने पुन्हा स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी आर्थिक मदत देऊ केली आहे. 

हे ही वाचा : 
हिवाळ्यामध्येही चीनला शिंगावर घेऊ 
जम्मू : पूर्व लडाखमध्ये भर हिवाळ्यामध्ये चीनसोबत पूर्ण ताकदीने युद्ध करण्याची आमची तयारी असल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे. चीनने या भागामध्ये युद्धसदृश स्थिती निर्माण केल्यास त्यांना भारतीय जवानांकडून तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देण्यात येईल, कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्ही मानसिकदृष्ट्या तयार आहोत, असे भारतीय लष्कराकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.

 दुसरीकडे लडाखमध्ये ताबारेषेवर आगळीक करणाऱ्या चीनने अरुणाचल सीमेवर देखील कुरापती सुरू केल्याने भारताचे लष्कर आणखी सावध झाले आहे. 

लष्कराच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की, ‘‘ शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फीटनेसचा विचार केला तर भारत खूप सरस आहे. चीनचे सैन्य हे प्रामुख्याने शहरी भागातील असून त्यांना दीर्घकाळ प्रतिकूल हवामानामध्ये तैनात राहण्याचा फारसा अनुभव नाही.’’ लष्कराच्या उत्तर आघाडीकडून या संदर्भातील निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

तत्पूर्वी चिनी सरकारचे मुखपत्र असणाऱ्या ‘ग्लोबल टाईम’मधून भारतीय लष्कराच्या तयारीवर टीका करण्यात आली होती. भारताचे लष्कर हे हिवाळ्यामध्ये लढू शकणार नाही असा कांगावा त्यांच्याकडून करण्यात आला होता. आज लष्कराच्या उत्तर आघाडीच्या प्रमुखांनी ही टीका फेटाळून लावली. 

 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख