पोलिस दलात लवकरच खांदेपालट; एसपी, डीसीपींच्या होणार बदल्या

३९ आयपीएस व ५६ बिगर केडर (एसपीएस) अधिकारी आहेत.
पोलिस दलात लवकरच खांदेपालट; एसपी, डीसीपींच्या होणार बदल्या
Superintendent of police and deputy commissioner will be transferred soon

पिंपरी : राज्य पोलिस दलात (Maharashtra Police Force) लवकरच मोठा खांदेपालट होऊ घातला आहे. पोलिस अधीक्षक (एसपी) आणि पोलिस उपायुक्त (डीसीपी) दर्जाच्या ९५ अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. त्यात पुण्यातील डीसीपी (परिमंडळ तथा झोन चार) पंकज देशमुख, पुर्णिमा गायकवाड (झोन तीन), मितेश गट्टे (विशेष शाखा दोन), स्वप्ना गोरे (मुख्यालय), पुणे रेल्वे एसपी सदानंद वायसे-पाटील, एसीबी पुणे एसपी राजेश बनसोडे आणि पुणे ग्रामीणचे अतिरिक्त अधीक्षक विवेक पाटील यांचा समावेश आहे. (Superintendent of police and deputy commissioner will be transferred soon)

दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याने या अधिकाऱ्यांच्या या सर्वसाधारण बदल्या होणार आहेत. त्यात ३९ आयपीएस व ५६ बिगर केडर (एसपीएस) अधिकारी आहेत. चौघांनी बदलीसाठी विनंती केली असून एक बदलीच्या प्रतिक्षेत आहेत. या बदलीसाठी पात्र अधिकाऱ्यांच्या बदलीची तीन ठिकाणे ही उद्यापर्यंत (ता. २८) त्यांच्या प्रमुखांना म्हणजे पोलिस आयुक्त आणि परिक्षेत्राच्या महानिरीक्षकांना कळविण्यास राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (आस्थापना) कुलवंत सारंगल यांनी सांगितले आहे.

बदली होणारे काही अधिकारी व त्यांची सध्याची पोस्टिंग (उर्वरित मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई पोलिस दलातील आहेत)

१. एस.व्ही. पाठक : एसआरपी (राज्य राखीव पोलिस दल)कमांडट, गट सात, दौंड, पुणे
२. राकेश ओला : एसपी, नागपूर ग्रामीण
३. अविनाश बारगळ : एसपी, एटीएस, औरंगाबाद
४. मोक्षदा पाटील : एसपी, औरंगाबाद
५. एस.पी.दिवाण : एसपी, सीआयडी, पुणे
६. निवा जैन : एसआरपीएफ कमांडट, पुणे ग्रामीण
७. डॉ. हरी बालाजी एन : एसपी, अमरावती ग्रामीण
८. महेंद्र पंडीत कमलाकर : एसपी, नंदूरबार
९. निलोत्पल : डीसीपी, झोन पाच, नागपूर
१०. विनिता साहू : डीसीपी, झोन दोन, नागपूर
११. डॉ. अक्षय शिंदे : डीसीपी, झोन चार, नागपूर
१२. चिन्मय पंडीत : एसपी, धुळे
१३. राजटिलकर्णि रोशन : एसपी, उस्मानाबाद
१४. एस. डी. आव्हाड : डीसीपी, नागपूर
१५. तानाजी चिखले : एसआरपी कमांडट, ग्रूप पाच, दौंड, पुणे
१६. शशिकांत सातव : डीसीपी, झोन दोन, अमरावती
१७. डॉ.दिनेश बारी (हागे) : एसपी, सीआयडी, कोल्हापूर
१८. तिरुपती काकडे : अतिरिक्त अधिक्षक, कोल्हापूर
१९. निकेश खाटमोडे : डीसीपी झोन दोन, औरंगाबाद
२०. लता फड : एसपी, सीआयडी, औरंगाबाद
२१. बापू बांगर : डीसीपी गुन्हे आणि विशेष शाखा, सोलापूर
२२. विठ्ठल मासाळ : डीसीपी,ईओयू, नागपूर
२३. पोर्णिमा चौगूले : डीसीपी, नाशिक
२४. सुनील कडासने : एसपी, एसीबी, नाशिक
२५. श्याम घुगे : अतिरिक्त अधिक्षक तथा अॅडिशनल एसपी, अमरावती ग्रामीण
२६. हेमराज राजपूत : अॅडिशनल एसपी, खामगाव, बुलढाणा
२७. अमोल तांबे : डीसीपी झोन दोन, नाशिक
२८. वैभव काळूभरमे : एसपी, रेल्वे, औऱंगाबाद
२९. संदीप पालवे : अॅडिशनल एसपी, उस्मानाबाद
३०. तुषार पाटील : अॅडिशनल एसपी, सिंधूदुर्ग
३१. शशिकांत बोराटे : प्रिन्सीपॉल, पीटीएस, खंडाळा
३२. स्वाती भोर : अॅडिशनल एसपी, अंबाजोगाई, बीड
३३. मनिषा दुबुले : अॅडिशनल एसपी, सांगली
३४. रश्मी नांदेडकर : एसपी, एसीबी, नागपूर
३५. ज्योती क्षीरसागर : प्रिन्सीपॉल, पीटीएस, तासगाव, सांगली
३६. विजय खरात : डीसीपी, नाशिक
३७. मीना मकवाना : डीसीपी, मुख्यालय, औऱंगाबाद
३८. कविता नेरकर : अॅडिशनल एसपी, रेल्वे, पुणे
३९. संजय लाटकर : प्रिन्सीपॉल, पीटीएस, सोलापूर
४०. संदीप आटोळे : प्रिन्सीपॉल, पीटीएस, नानवीज, दौंड, पुणे
४१. सचिन गुंजाळ : अॅडिशनल एसपी, रायगड

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in