सुळे म्हणाल्या, "महाराष्ट्रात घडलं.. ते अमेरिकेतही घडलं..वय जास्त असलं म्हणून काय झालं.. - Sule said It happened in Maharashtra  It also happened in America | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

सुळे म्हणाल्या, "महाराष्ट्रात घडलं.. ते अमेरिकेतही घडलं..वय जास्त असलं म्हणून काय झालं..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्यो बायडन यांचा फोटो  टि्वट केला आहे. 

पुणे : अमेरिकेमध्ये व्हाइट हाऊससाठीच्या उत्कंठावर्धक शर्यतीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन हे अखेर विजयी ठरले आहेत. त्यांनी मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. ट्रम्प यांचे दुसऱ्या टर्मचे स्वप्न बायडेन यांनी धुळीस मिळवले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक फोटो शेअर केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्यो बायडन यांचा फोटो सुळेंनी टि्वट केला आहे. 

आपल्या टि्वटमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, "वय जास्त असलं म्हणून काय झालं, लोकांसाठी काम करण्याची ऊर्जा तरुणांनाही मागे टाकणारी आहे. म्हणूनच ते नेहमी विजयी ठरतात.त्यांचा आपल्या मूल्यांवर ठाम विश्वास असतो व ते त्यासाठी संघर्ष करतात. हे आपण महाराष्ट्रात घडताना पाहिलं आणि आता अमेरिकेतही घडलं."

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील भर पावसाच्या सभेनं महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलली होती. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांची अशीच एक सभा फ्लोरिडा येथे झाली होती. ही सभा इतिहास घडवेल का, याकडे अनेकांचे लक्ष होते. या दोन्ही सभेचे फोटो सुप्रिया सुळे यांनी आपल्या टि्वटर हॅंडलवरून शेअर केले आहेत. 

अमेरिकेच्या अध्यक्षपदी ज्यो बायडन यांची निवड झाली असली तरी फ्लोरिडा राज्यातील पावसातील सभेचा फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसते. बायडन यांना फ्लोरियामध्ये 52 लाख 64 हजार 453 मते (47.9 टक्के) मिळाली तर डोनाल्ट ट्रम्प यांना 56 लाख 58 हजार 847 मते (51.2 टक्के) मिळाली आहेत.

शरद पवार यांच्या साताऱ्यातील भर पावसाच्या सभेनं महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलली. या घटनेची नोंद राजकीय इतिहासात ठळकपणे झालीच पण विरोधकांच्या स्वप्नांवरही पाणी फेरलं गेलं. या सभेनं लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसलेंचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीला या सभेचा फायदा झाला. अशीच एक सभा अमेरिकेत झाली होती.  
 
फ्लोरिडा येथे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांच्या भाषणावेळी वादळी पाऊस सुरू झाला. पाऊस थांबत नव्हता. मात्र अशा पावसातही बायडन यांनी जोरदार भाषण केलं.. अन् उपस्थितांची मने जिंकली. यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. बायडन यांनीदेखील त्यांच्या ट्विटर हॅडलवरून सभेतील फोटो ट्विट केला होता. बायडन यांनी टि्वट करून हा फोटो शेअर केला होता. त्यांना म्हटल होते की "हे वादळ जाईल आणि नवा दिवस येईल"    
 Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख