आम्हाला विचारुन सभापती ठरवा, अन्यथा आघाडीतून बाहेर पडू ; शिवसेनेचा इशारा

सभापती-उपसभापती निवडीमुळे शिरुर तालुक्याचे राजकारण चांगलेच रंगत चालले आहे.
2Sarkarnaa_20Banner_20_2841_29.jpg
2Sarkarnaa_20Banner_20_2841_29.jpg

शिक्रापूर : ''शिरुर बाजार समितीच्या सभापती-उपसभापती निवडीत शिवसेनेला विचारल्याशिवाय कुठलाच निर्णय घेवू नये. अन्यथा भविष्यातील सर्व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आम्ही स्वतंत्र विचार करुन तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत महाआघाडीतून बाहेर पडून निर्णय घेवू,'' असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे व गणेश जामदार यांनी दिला. Sudhir Farate and Ganesh Jamdar warn Mahavikas Aghadi

शिरुर बाजार समितीच्या सभापती-उपसभापती निवडीमुळे शिरुर तालुक्याचे राजकारण चांगलेच रंगत चालले आहे. राष्ट्रवादी-भाजपाचे बलाबल १४:०४ असे असताना राष्ट्रवादीने भाजपाचे दोन जण आपल्याकडे ओढून १६:०२ असे केले आहे. पर्यायाने एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादीकडून आता शिरुर-आंबेगाव व शिरुर-हवेली असे सभापती-उपसभापती निवडीत राजकारण आणल्याची चर्चा आहे. या वादात भाजपाने उडी घेवून आम्हीही दोन्ही पदांसाठी उमेदवार उतरविणार असल्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रवादी तालुक्याचे दोन तुकडे करीत असल्याचा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सभापती-उपसभापती निवडीत आम्हाला महाआघाडी म्हणून विश्वासात घ्या, आमच्या वरिष्ठ नेत्यांना तसेच जिल्हाध्यक्ष माऊली कटके यांना निवड चर्चेला बोलवून निर्णयात सहभागी करुन घ्या अशी मागणी केली आहे. 

शिरुरचे शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर फराटे म्हणाले की, ३० वर्षांचा पारंपारिक मित्र असलेल्या भाजपाच्या विरोधात जावून आम्ही सत्तेची फळे महाआघाडी म्हणून राष्ट्रवादीला चाखायला दिली आहेत. आगामी काळात सर्व निवडणूका महाआघाडी म्हणून लढण्याची घोषणाही पक्षाकडून या पूर्वीच झालेली आहे. पर्यायाने शिरुर-हवेलीतील सर्व निवडणूका, निवडी-नियुक्त्यांच्या बाबतीत महाआघाडी म्हणून राष्ट्रवादीने आपला धर्म पाळला पाहिजे. भाजप जर दोनच संचालक असतानाही जाहीरपणे शिरुरचा सभापती-उपसभापती आम्ही ठरवू म्हणत असेल तर आता या निवडणूकीत महाआघाडी म्हणून उतरायला हवे. त्यासाठी सभापती-उपसभापती हे ठरविताना शिवसेनेला विश्वासात घ्यावे. पूर्व भागात फक्त एकच दांपत्य राजकारणात उच्च स्थानी, बाकी कुणालाच मोठे स्थान नाही, आता हे बदलायला हवे. 

आंबेगाव-शिरुरचे शिवसेना तालुकाप्रमुख गणेश जामदार म्हणाले की, भाजपाच्या विरोधात आम्ही चर्चेसाठी, सभापती-उपसभापती हे ठरविण्यासाठी कधीही उपलब्ध आहोत. पर्यायाने आपण महाआघाडी म्हणून राज्यात सत्तेत असताना राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी कुठलाच अहम न ठेवता आमचे जिल्हाध्यक्ष माऊली कटके यांना सभापती-उपसभापती निवडीच्या बैठकीला बोलवावे. आम्हीही दोन्ही तालुकाप्रमुख उपस्थित राहू व आमचे नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या सुचनेनुसार योग्य तो निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीला मनापासून मदत करु. मात्र आमच्या शिवाय काही करु पाहत असाल तर तालुक्यातील येवू घातलेल्या पंचायत समिती-जिल्हा परिषद, घोडगंगा सहकारी साखर कारखाना, खरेदी-विक्री संघ, जिल्हा बॅंक, जिल्हा दुध संघ आदी निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम दिसतील.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com