BHR गैरव्यवहार : एकनाथ खडसेंचे आरोप सुभाष देशमुखांनी फेटाळले... - Subhash Deshmukh denied Eknath Khadse's allegations regarding BHR | Politics Marathi News - Sarkarnama

BHR गैरव्यवहार : एकनाथ खडसेंचे आरोप सुभाष देशमुखांनी फेटाळले...

विश्वभूषण लिमये
शनिवार, 5 डिसेंबर 2020

केंद्र सरकारने ही चौकशीचे आदेश दिले नव्हते, जर केंद्राने आदेश दिले असते तर राज्याला चौकशी करावीच लागली असती.

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नुकतंच बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहाराबाबत चौकशीचे आदेश केंद्र सरकारने दिले होते मात्र, राज्याचे तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर राजकीय दबाव असल्याने चौकशी थांबवण्यात आली होती, असा आरोप पत्रकार परिषदेत केला होता. 

बीएचआर पथसंस्थेमध्ये तब्बल अकराशे कोटींचा गैरव्यवहार आहे आणि त्यात मोठे मोठे नेते अडकले आहेत, असा खडसेंनी आरोप केला आहे. दरम्यान बीएचआर ही बहुराज्य संस्था आहे, त्याच्यावरती भारत सरकार सहकार विभागाच नियंत्रण असतं, 
मात्र एकनाथ खडसेंनी याबाबतची तक्रार ही महाराष्ट्र राज्य सहकार विभागाकडे केली होती, त्यामुळे थेट चौकशी करता येत नव्हती. मात्र याबाबत पुरावे तसे नव्हते आणि केंद्र सरकारने ही चौकशीचे आदेश दिले नव्हते, जर केंद्राने आदेश दिले असते तर राज्याला चौकशी करावीच लागली असती, आणि आम्ही आमच्यापरीने त्याची चौकशी केलेलीच आहे. असं म्हणतं तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी एकनाथ खडसेंचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर)पतसंस्थेत झालेल्या जमीन विक्री घोटाळ्याशी आपला कोणताही संबध नाही. जामनेर येथील जमीन आपण लीलाव झाल्यानंतर तब्बल साडेतीन वर्षानंतर संबधित मालकाकडून खरेदी केली आहे. पारस ललवाणी हे चुकिची माहिती देत आहेत. असे प्रतिपादन माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

‘बीएचआर’ठेवी गैरव्यवहार प्रकरणी पुणे येथील आर्थिक गुन्हे विभागाकडून तपास सुरू आहे. या प्रकरणी जामनेर येथील माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी काल पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी या पतसंस्थेच्या कोट्यवधीच्या मालमत्ता कवडीमोल भावात खरेदी केल्या तसेच कार्यकर्त्यांना मिळवून दिल्याचा आरोपही केला. शिवाय जामनेर तालुक्याती शहापूर फत्तेपूर रोडवरील जमीनी त्यांनी खरेदीकेल्या असून यातील उताऱ्यावर गिरीश महाजन व साधना महाजन यांची नावे असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

गिरीश महाजन म्हणाले, ''बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहाराशी आपला कोणताही संबध नाही, आपण या पतसंस्थेचे भागीदारही नाही. आपण या संस्थेकडून कधी कर्जही घेतलेले नाही.  आपल्यावर होत असलेले आरोपही चुकिचे आहेत.जामनेर तालुक्याल  सहा एकर जमीन खरेदीच्या व्यवहारात खाते उताऱ्यावर आपले व पत्नी साधना महाजन यांचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. या जमिनीच्या खरेदीचा व्यवहार रिसतर करण्यात आला आहे. ही जमीन पुणे  येथील एका उद्योजकाने साडेतीन वर्षापूर्वी खरेदी केली होती. परंतु आता  चार महिन्यापूर्वी ‘कोविड’काळात त्याला अडचण आल्यामुळे त्यांनी जमीन विक्रीस काढली आपण त्यांची खरेदी केली असून त्यांला रिसतर बँकेतून धनादेशाव्दारे पैसेही दिले आहेत,'' त्यामुळे यात गैरव्यवहार करण्याचा प्रश्‍न येतोच कुठे?असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे.

 (Edited  by : Mangesh Mahale)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख