राज्यपालांचा मी लाडका मंत्री ..मला कुठलीही अडचण येत नाही... - statement of Uday Samant about the Governor Bhagat Singh Koshyari | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

राज्यपालांचा मी लाडका मंत्री ..मला कुठलीही अडचण येत नाही...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

उदय सामंत यांनी  'मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे' असं वक्तव्य केलं आहे.

सोलापूर  : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांचा संघर्ष सर्वश्रुत असताना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी  'मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे' असं वक्तव्य केलं आहे. उदय सामंत हे आज सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  

 
उदय सामंत म्हणाले, 'राज्यपाल आणि माझा कायम संपर्क असतो. मी त्यांचा लाडका मंत्री असल्याने मला कोणतीही अडचण येत नाही. आठ दिवसापूर्वी मी त्यांच्याशी चर्चा करून आलो. बाहेर राजकीय काही गोष्टी होत असतील.. पण हे खाते चालवितांना मला कुलपती म्हणून त्यांना भेटावे लागते. त्यांच्यासोबत काम करावे लागते.' 

 

हेही वाचा  : एल्गार परिषदेला परवानगी, शिवजयंतीला का नाही.. 
मुंबई :  यंदा शिवजयंतीवर कोरोनाचं सावट आहे. गृहमंत्र्यालयानं काढलेल्या आदेशामुळे शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे भाजप नेते आक्रमण झाले आहेत. दोन दिवसापासून राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोक वर काढलं आहे. यामुळे राज्य सरकारनं नवा आदेश काढून शिवजयंती साजरी करण्यावर काही नियम व अटी घातल्या आहेत. यावर भाजपचे नेते राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.  शिवजयंती उत्साहात साजरी करू द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करणार, असा इशारा राम कदम यांनी सरकारला दिला आहे. एल्गार परिषदेचा परवानगी मग शिवजयंतीला का नाही, असा सवाल कदम यांनी राज्य सरकारला केला आहे. याबाबत राम कदम यांनी टि्वट करीत राज्य सरकारला जाब विचारला आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख