कोरोना तपासणीच्या दरात 40 टक्क्यांनी कपात : सरकारने दिला दिलासा - state govt reduces rate for corona test by 40 percent | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना तपासणीच्या दरात 40 टक्क्यांनी कपात : सरकारने दिला दिलासा

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

राज्यभर आठ सप्टेंबरपासून या दरांची अंमलबजावणी 

मुंबई : राज्य सरकराने कोरोना तपासणीसाठी नागरिकांना दिलासा दिला असून यासाठीच्या शुल्कात जवळपास 40 टक्क्यांची कपात केली आहे. याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी आठ सप्टेंबरपासून होणार आहे.

साथरोग अधिनियमाअंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार कोविड केंद्रावर घेण्यात येणाऱ्या स्वॅबच्या तपासणीसाठी यापुढे 1900 रुपयांऐवजी 1200 रुपये घेण्यात येतील. रुग्णालये, पॅथलाॅजिकल लॅब या ठिकाणी हे दर 2200 रुपयांहून 1600 रुपये करण्यात आले आहेत. रुग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेणे असेल तर त्यासाठीचे शुल्क हे 2500 रुपयांहून 2000 झाले आहे. या शुल्कामध्ये पीपीए किट, आरटीपीसीआर किट, रिपोर्ट कळविणे या सर्वांचा समावेश आहे. या पेक्षा जास्त शूल्क कोणाला घेता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. 

दुसरीकडे कोविड रुग्ण तसेच नॉन कोविड रुग्णांनाही उपचार मिळणे आवश्यक आहे,नॉन कॉविड रुग्णांना कोणत्याही रुग्णालयांनी उपचार नाकारु नयेत .रुग्णालयांनी आवश्यक ती काळजी घेऊन तात्काळ उपचार करण्याची दक्षता घ्यावी, अशा सर्व रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. 

पुणे शहरातील सात सप्टेंबरची स्थिती

- दिवसभरात २०५३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात १६३९ रुग्णांना डिस्चार्ज.
- पुण्यात ५९ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. २२ रूग्ण पुण्याबाहेरील.
- ९१२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ४८० रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १०७९५८.
- पुण्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या- १६८३०.
- एकूण मृत्यू -२५४९.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- ८८५७९.
- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ३३५४. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख