गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यंदाही सार्वजनीक गणेश उत्सवावर निर्बंध असणार आहेत.
 Ganeshotsav .jpg
Ganeshotsav .jpg

मुंबई : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमिवर यंदाही सार्वजनीक गणेश उत्सवावर निर्बंध असणार आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात फटका महाराष्ट्राला बसला आहे. त्यातच संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकारने उपाययोजना चालू केल्या आहेत. त्यामुळे गृह विभागाने गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. (State Government issued guidelines regarding Ganeshotsav)

त्यामध्ये म्हटले आहे की ''गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित. कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साध्या प्रकारे साजरा करावा. सार्वजनिक गणेश मूर्ती ४ फूट व घरगुती गणेश मूर्तीची २ फूट उंचीची असणे अपेक्षित आहे. गणेश मृर्तींचे विसर्जन कृञिम तलावात करावे. शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी. 

नागरिक देतील ती वर्गणी स्विकारावी. शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी. सांस्कृतिक उपक्रमा ऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावे. आरती, भजन, किर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी. नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे. गणपती मंडपात निर्जंतुकीकरण व थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. 

आरोद्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. कोरोना निर्बंध कायम राहतील, गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथीलता देण्यात आलेली नाही. सार्वजनिक गणेशोत्वासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. चाळीतील किंवा इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तींच्या विसर्जनाची मिरवणून एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत. या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.  

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com