दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी...असे होणार मूल्यांकन... - State Board announces guidelines for conducting examinations of 10th and 12th class students | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी...असे होणार मूल्यांकन...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 एप्रिल 2021

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन्ही सत्रात परीक्षा न घेता एकाच सत्रात परीक्षा घ्यावी लागणार आहे.

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य व शारिरीक विषयाच्या परीक्षेबाबत दहावी व बारावीचे विद्यार्थी-पालक, त्याचबरोबरच शिक्षकांमध्ये संभ्रम होता. या परीक्षा कधी आणि कशाप्रकारे घ्यायच्या, त्यांचे मूल्यांकन कसे करायचे, अशी पेचात शिक्षक होते यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने  मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.  

राज्य मंडळाकडून अखेर याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर या सूचना सविस्तरपणे उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या राज्यातील विभागीय मंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून दिल्या आहेत. 

 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर केले आहे.  दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन्ही सत्रात परीक्षा न घेता एकाच सत्रात परीक्षा घ्यावी लागणार आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांचे लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या नवीन मूल्यमापन आराखड्यानुसार मूल्याकंन करण्यात येणार आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर या परीक्षांचे आयोजन करून १० जूनपर्यंत त्याचे मूल्याकंन संबंधित विभागीय मंडळाकडे सादर करावे लागणार आहे. 

राज्यमंडळाकडून तज्ज्ञांमार्फत यु-ट्युबवर प्रशिक्षणही उपलब्ध करून दिले होते. प्रशिक्षणादरम्यान प्रश्न विचारण्याची संधी न मिळाल्याने शिक्षक नाराज होते. या सूचना सविस्तरपणे उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या राज्यातील विभागीय मंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून दिल्या आहेत. 

दहावीचे असे होईल मूल्यांकन

दहावीसाठी दोन्ही सत्रांत परीक्षा न घेता एकाच म्हणजे द्वितीय सत्रात परीक्षा घ्यावी लागणार आहे. प्रात्यक्षिक व लेखन कार्य प्रत्येकी ५० गुणांची परीक्षा घेऊन मिळालेल्या १०० गुणांपैकी प्रचलित पद्धतीनुसार श्रेणी देण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक परीक्षा न घेता लेखन कार्य पूर्व करून घ्यावे लागणार आहे.

बारावीचे असे होईल मूल्यांकन
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेसाठी २५ आणि प्रात्यक्षिक परीक्षेसाठी २५ अशा ५० गुणांची परीक्षा होणार आहे. आरोग्याधिष्ठित, कौशल्याधिष्ठित शारीरिक क्षमतेवर आधारित कोणतीही एक क्षमता, कोणताही एका सांघिक खेळाची निवड करून क्रीडा कौशल्य सादरीकरण करणे, योग व प्राणायाम, दोन आसने विविध क्रीडा स्पर्धातील सहभाग व तासिका, पुस्तक लेखन कार्य यावर परीक्षा घ्यावी लागणार आहे.

Edited by: Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख