स्टँडअप कॉमेडी शो साठी कठोर सेन्सॉरशिप हवी...

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कॉमेडियन अग्रीमा जोशुआ हिला अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
3manisha_kayande_ff_0.jpg
3manisha_kayande_ff_0.jpg

मुंबई : समाजमाध्यमांवर प्रसिद्धीचे वेड लागलेल्या तरुणाईला आपण कोणत्या व्यक्तिविषयी काय बोलत आहोत याचा ताळतंत्र राहिलेला नाही. त्यामुळे नुकताच एका कॉमेडियनने छत्रपती शिवाजी महाराजांचाही अपमान
केला, अशा स्थितीत या स्टँडअप कॉमेडी शो वर बंदी घालावी किंवा त्यांच्यावर सेन्सॉरशिप आणावी, अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे यांनी केली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कॉमेडियन अग्रीमा जोशुआ हिला अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात आमदार मनीषा कायंदे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिले आहे. व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली आज स्टॅन्ड अप कॉमेडी शो मध्ये अनेक थोर विचारवंत, महिला, राष्ट्रपुरुष वा अनेक वेळा एखाद्यासमाजाची नाहक बदनामी होत असते. शॉर्टकट मार्गाने प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्टँड अप कॉमेडीकडे आजचा तरुण वर्ग वळू लागला आहे. अगदी १६ -१७ वर्षांची मुले युट्युब फेसबुक व इतर समाजमाध्यमांच्या साह्याने प्रसिद्धीसाठी स्टँड अप कॉमेडीचा आसरा शोधू लागली आहेत. त्यामुळे या प्रकारावर कायदेशीर नियंत्रण हवे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

वास्तवात हे कॉमेडी शो करणाऱ्या विद्यार्थ्याचे वाचन व चिंतन खूपच कमी असते. त्यामुळे टाळ्या मिळवण्यासाठी ही मुले अपुऱ्या माहितीच्या आधारावर इतिहासातील घटनांवर विनोदनिर्मिती करतात व कळत नकळत यांच्याकडून राष्ट्रपुरुष तर कधी एखाद्या समाजाचा जाहीर अपमान होत असतो. कधी कधी तर रामायण व महाभारत ग्रंथातील व्यक्तींवर कॉमेडी होताना दिसते. आज मुंबई पुण्यातील अनेक खाजगी हॉटेल्समध्ये हे स्टॅन्ड अप कॉमेडी शो तिकीट घेऊन आयोजित केले जातात. परंतु त्यातील विनोदांवर कोणाचेच नियंत्रण नसते, त्यामुळे या कार्यक्रमांवर सेन्सॉरशिप लावणे गरजेचे झाले आहे, असे म्हणणे कायंदे यांनी मांडले आहे. 

कोणतेही नाटक, चित्रपट आदींना सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. तोच नियम या स्टँडअप कॉमेडीशो साठी लागू करावा. कोणीही उठून कोणताही जाहीर कार्यक्रम करावा, अशी बेबंदशाही होऊ देऊ नये. या शो साठी देखील कायदे-नियम करावेत, अशी मागणीही कायंदे यांनी केली आहे.


हेही वाचा : मल्लविद्येचा उपासक शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारापासून वंचित...
 
पुणे : "लाल मातीशी इमान राखणारा मल्लविद्येचा एक सच्चा उपासक शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारापासून वंचित राहिला आहे. आजवरच्या सरकारने त्यांची उपेक्षा केली आहे," अशी खंत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे  मराठी, संस्कृत व हिंदीमधील सुंदर म्हणींचादेखील पुजारी कुस्ती मैदानात खुबीने वापर करून कुस्तीचा प्रचार-प्रसार करत असतात. बलाढय़ मल्लांच्या लढतीचे वर्णन करताना त्या वर्णनाला अध्यात्म व संतसाहित्याची जोड देणे हे पुजारींचे खास वैशिष्ट्य आहे."असे शेट्टी यांनी म्हटले आहे "लाल मातीशी इमान राखणारा मल्लविद्येचा एक सच्चा उपासक मात्र शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारापासून वंचित राहिला आहे."अशी खंत शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com