तटकरेंची पाठराखण करत जयंत पाटलांनी शिवसेना आमदारास सुनावले 

प्रत्येकाने आपल्या मर्यादा ओळखून राहिले पाहिजे.
Standing behind Sunil Tatkare, Jayant Patil warns Shiv Sena MLA
Standing behind Sunil Tatkare, Jayant Patil warns Shiv Sena MLA

रत्नागिरी : खासदारांना कुठेही जाऊन आढावा घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे खासदार सुनील तटकरे यांनी घेतलेल्या बैठकीबाबत आक्षेप घेण्याची गरज नाही. प्रत्येकाने आपल्या मर्यादा ओळखून राहिले पाहिजे. हक्कभंगापर्यंत जाण्याची गरज नव्हती. तटकरे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आहेत. त्यांचा मान-सन्मान राखलाच पहिजे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तटकरेंची पाठराखण करत शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांना सुनावले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे दापोलीचे आमदार योगेश कदम या महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांमध्ये काही दिवसांपासून बिनसले आहे. तटकरे खेड, दापोली तालुक्‍यात येऊन स्थानिक आमदार म्हणून कोणत्याही विकास कामांच्या उद्‌घाटनात मला निमंत्रित करत नाहीत, असा आक्षेप घेत तटकरे यांच्या विरोधात कदम यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला आहे. यावरून शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तणाताणी झाली होती. अजूनही हा विषय धुमसत आहे. 

यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, खासदार म्हणून सुनील तटकरे यांना आढावा बैठक घेण्याचा अधिकार आहे. लोकांनी त्यांना निवडून दिले आहे. मी देखील कधी खासदारांनी आढावा घेतल्यास त्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे हा विषय ताणण्याची गरज नाही. आपल्या मर्यादा आपण ओळखून राहिले पाहिजे. बैठका घेणे वावगे नाही. सुनील तटकरे यांचा मान सन्मान राखणे आवश्‍यक आहे. 

प्रकल्प चांगला असेल तर स्वागत केले पाहिजे 

नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत अनेक शंका स्थानिक ग्रामस्थांच्या मनात आहेत. अणुऊर्जा प्रकल्प आणि रिफायनरीमधील अंतर, प्रदूषण, मच्छीमारीवर होणारा परिणाम आदीमुळे स्थनिकांचा विरोध आहे. जनतेच्या मताचा आदर करून यावर निर्णय घेऊ. मात्र, प्रकल्प चांगला असला तर त्याचे स्वागत केले पाहिजे, असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. 

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या बाजूने निर्णय होईल 

मराठा आरक्षणाबाबतचे प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयात आहे. तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने घेतलेला निर्णय अनपेक्षित होता. मात्र, त्याचा आम्हाला आदर आहे. यामध्ये २०२०-२१ मधील भरतीला स्थगिती, शैक्षणिक प्रवेशाला स्थगिती दिली आहे. आम्ही ही मागणी केली नव्हती. मात्र, राज्य सरकार पुन्हा आपली बाजू मांडेल. एक महिन्याचा कालावधी दिला आहे. आरक्षण टिकावे, यासाठी आमचा प्रयत्न असून नक्कीच आमच्या बाजूने निर्णय होईल, असा विश्‍वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com