#SSRSuicide :  अंकिता लोंखडे हीच्या टि्वटची चर्चा...

सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोंखडे हीने टि्वट केले आहे. यात अंकिताने म्हटले आहे की ''सत्याचाच विजय होईल'' ('Truth Wins') अंकिता लोंखडेंच्या या टि्वटवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
3ankita_lokande_Sushant.jpg
3ankita_lokande_Sushant.jpg

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह रजपूत याच्या आत्महत्येची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध सुशांतचे पिता के.के. सिंह यांनीच एफआयआर दाखल केली आहे. सुशांतची बहिण श्र्वेता सिंह कीर्ती हिनेही आपल्या भावाच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्यावर कारवाईची मागणी केली आहे. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोंखडे हीने टि्वट केले आहे. यात अंकिताने म्हटले आहे की ''सत्याचाच विजय होईल'' ('Truth Wins') अंकिता लोंखडेंच्या या टि्वटवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

सुशांत सिंह रजपूत यांच्या निधनानंतर अंकिता खूपच निराश होती. यातून बाहेर पडण्यासाठी ती प्रयत्न करीत होती. काल सुशांतचे वडीलांनी याबाबतची तक्रार पाटना पोलिसांकडे दाखल केली आहे. यानंतर अंकिताने हो आज टि्वट केले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या आग्रहामुळे पाटणा पोलिस सुशांतसिंगच्या कुटुंबियांची तक्रार नोंदवून घ्यायला तयार झाल्याची माहिती माजी अतिरिक्त साॅलिसिटर जनरल व सुशांतसिंहच्या कुटुंबियांचे वकिल विकास सिंग यांनी दिली. दरम्यान, बिहार पोलिसांचे पथक आज सकाळी मुंबईत दाखल झाले असून मुंबई क्राईम ब्रँचच्या पोलिस उपायुक्तांच्या कार्यालयात हे पथक गेले असल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे.  

ही तक्रार नोंदवून घेण्यासाठी पाटणा पोलिस काहीशी टाळाटाळ करत होते. मात्र मुख्यमंत्री नितीश कुमार व मंत्री संजय झा यांनी त्यांना परिस्थिती समजून सांगितल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली, असे विकास सिंग म्हणाले. सुशांतसिंहच्या कुटुंबियांनी अद्यापपर्यंच सीबीआय चौकशीची मागणी केली नसल्याचेही त्यांनी सांगितले.सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याचे कुटुंबिय मोठ्या धक्क्यात होते. मुंबई पोलिस त्यांची तक्रार नोंदवून घ्यायला तयार नव्हते. उलट काही बड्या प्राॅडक्शन हाऊसची नावे पोलिस या कुटुंबियांकडे मागत होते, अशी माहितीही विकास सिंग यांनी दिली. या प्राॅडक्शन हाऊसेसना गुंतवण्यासाठी मुंबई पोलिसांना ही नावे हवी होती, असाही दावा त्यांनी केला. 

अभिनेता सुशांत सिंह रजपूत याची आत्महत्या ही सर्वच पातळीवर चर्चैचा विषय ठरला. चित्रपट, संगीत, राजकीय क्षेत्रातील अनेक जणांनी याबाबत सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले. सुशांतने आत्महत्या केली की त्याचा खून झाला याबाबत अनेकांनी आपले मत व्यक्त केले. यात राजकीय नेत्यांनी टि्वटवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. काहींनी या प्रकऱणाची सीबीआय चैाकशीची मागणी केली. पण त्याच्या चाहत्यांची संख्या लक्षात घेता आता सुशांतची आत्महत्या या विषयाचे राजकारण करून बिहारच्या राजकारणात हा राजकीय मुद्या होण्याची शक्यता आहे. 

 सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी नुकताच ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जबाब नोंदविला आहे. आज धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांची पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला आहे. सुशांतने धर्मा प्रॉडक्शनसोबत शेवटी केलेल्या ड्राईव्ह या चित्रपटाच्या कराराची प्रतही मेहता यांनी पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी यशराज फिल्म्सचे (वायआरएफ) आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचीही पोलिसांनी नुकतीच चौकशी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३९ जणांचे जबाब नोंदविले आहेत.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा मॅरेथॉन तपास सुरू आहे. आगामी काळात आणखी काही जणांचे जबाब नोंदविण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. सुशांत याने 14 जूनला मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३९ जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com