पुण्यात चांगले काम केलेल्या SP संदीप पाटील यांना गडचिरोलीला पाठविले - SP Sandeep Patil Trasnsfers to Gadchiroli despite good work | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्यात चांगले काम केलेल्या SP संदीप पाटील यांना गडचिरोलीला पाठविले

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

पोलिसांच्या बदल्या अखेर झाल्या...

पुणे : पुण्यात चांगले काम करणारे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची गडचिरोलीला बदली करण्यात आली. नक्षलवाद विरोधी पथकाचे पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून म्हणून त्यांना जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.

पाटील यांनी पुण्यात वेगवेगळे प्रयोग राबवून जिल्ह्यातील नागरिकांची मने जिंकली होती. पुण्यात येण्याआधी त्यांनी सातारा आणि गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक म्हणूनही ठसा उमटवला होता. त्यांना परत गडचिरोलीला पाठविण्यात आल्याने आश्चर्य़ व्यक्त होत आहे.

इतर बदल्या पुढीलप्रमाणे : डॉ. जय जाधव (महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामांडळ येथून सहपोलीस आयुक्त, नवी मुंबई)

निसार तांबोळी (सिडको दक्षतावरून विशेष पोलिस महानिरीक्षक नांदेड परीक्षेत्र)

चंद्रकिशोर मीना (राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 8 वरून विशेष पोलिस महानिरीक्षक, अमरावती) 

संजय दराडे (पोलीस उपमहानिरीक्षक (विक्रीकर) वरून अपर पोलीस आयुक्त, पूर्व विभाग मुंबई) 

एस वीरेश प्रभु (अतिरिक्त पोलीस आयुक्त, मध्य विभाग वरून मुंबई अपर पोलीस आयुक्त, गुन्हे)

सत्य नारायण (उपमहानिरीक्षक, व्हीआयपी सेक्युरीटी येथून अपर आयुक्त दक्षिण विभाग मुंबई)

ज्ञानेश्वर चव्हाण (अपर पोलीस आयुक्त, (संरक्षण व सुरक्षा) येथून अपर आयुक्त, मध्यविभाग मुंबई)

नामदेव चव्हाण (पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथून अपर पोलिस आयुक्त उत्तर विभाग, पुणे)

श्रीमती आरतीसिंग (पोलिस अधीक्षक नाशिकवरून  आयुक्त, अमरावती शहर)

संदीप कर्णिक  (अतिरिक्त पोलिस आयुक्त, गुन्हे, येथून अतिरिक्त पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग मुंबई)

एस. एच. महावरकर (अपर पोलीस आयुक्त, उत्तर विभाग येथून अतिरिक्त पोस आयुक्त नागपूर)
 
लख्मी गौतम (अपर पोलीस आयुक्त, पुर्व विभाग मुंबई येथून उपमहानिरीक्षक एसीबी, मुंबई)

वीरेंद्र मिश्रा (उपायुक्त पुणे मुख्यालय येथून अपर पोलिस आयुक्त सशस्त्र पोलीस बल, मुंबई) 

एस जयकुमार (अपर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस बल येथून अपर पोलिस आयुक्त मीरा-भाईंदर)

संदीप बी. पाटील (पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक येथून उपमहानिरीक्षक, गडचिरोली नागपूर परीक्षेत्र)

अमरावती क्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, अपर पोलिस आयुक्त मुंबई निशीत मिश्रा, पुण्यातील अपर पोलिस आयुक्त सुनील फुलारी,  अमरावीचे पोलिस आयुक्त संजयकुमार बाविसकर, मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त (पश्चिम विभाग) मनोज शर्मा, पोलिस उपमहानिरीक्षक गडचिरोली महादेव तांबडे यांच्या बदल्यांचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख