संजय राठोड पुढील काही तासांत `माजी मंत्री` होणार....

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्याचापहिला राजीनामा
sanjay rathod-pooja chavan
sanjay rathod-pooja chavan

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावरील आरोप तसेच कोविडकाळात त्यांनी केलेले नियमांचे उल्लंघन या अत्यंत अयोग्य बाबी असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे झाले असल्याचे विश्वसनीयरित्या समजते. त्यामुळे त्यांना लवकरच राजीनामा द्यावा लागणार असल्याची चर्चा आहे. गेले काही दिवस ते `डेंजर झोन` मध्ये होते. मात्र विधीमंडळाचे अधिवेशन राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गाजणा असल्याने त्यांना राजीनामा देण्याचा निरोप दिल्याचे सांगण्यात आले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांची संजय राठोड यांनी दोन दिवसांपूर्वी भेट घेतली. त्यात मुख्यमंत्र्यांनी राठोड यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे सांगण्यात आले आहे. 'मी काही निर्णय घेण्याअगोदर तू तुझा निर्णय घे,' असे मुख्यमंत्र्यांनी राठोडांना सांगितल्याचे समजते. त्यामुळे येत्या अधिवेशनाआधी संजय राठोड राजीनामा देतील अशी शक्यता आहे. 

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे हे त्यांच्या विश्वासू मंत्र्यांसोबत या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा करणार आहेत असेही समजते. या दरम्यान राठोड स्वत:हून पायउतार होतील तर बरे असेही सांगितले जात होते. त्यामुळेच राठोड यांना पायउतार झाल्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.  

राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आता आक्रमक भूमिका घेतली असून अधिवेशन होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. भाजपच्या महिला मोर्चातर्फे आज राज्यभर त्यासाठी आंदोलन करण्यात आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आणि या प्रकरणात पोलिस दबावाखाली असल्याचा आरोप केले. त्यात त्यांचे पती किशोर वाघ यांच्यावर अपसंपदा जमा केल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्याने दोन्ही बाजूंनी राजकीय वातावरण पेटले आहे. विधीमंडळाचे अधिवेशन येत्या एक मार्चपासून त्या आधीच राठोड यांना अभय मिळणार की त्यांना पदावरून जावे लागणार, याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com