मोठी बातमी : काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळेपर्यंत सोनिया गांधीच अध्यक्षपदी राहणार

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा एक वर्षाचा कार्यकाळ उद्या संपत आहे. यामुळे काँग्रेसचे अध्यक्षपद रिकामे राहणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
sonia gandhi will be interim president of congress till new president elected
sonia gandhi will be interim president of congress till new president elected

नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा कार्यकाळ उद्या (ता.10) संपत आहे. त्यांचा कार्यकाळ संपत असल्याने पक्षाचे अध्यक्षपद रिकामे राहणार की काय अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. यावर पक्षाने खुलासा केला असून, नवीन अध्यक्षांची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सोनिया गांधीच हंगामी अध्यक्ष राहतील, असे म्हटले आहे. 

याविषयी काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक संघवी म्हणाले की, सोनिया गांधी यांचा हंगामी अध्यक्षपदाचा कार्यकाळ उद्या (ता.10) संपत आहे हे खरे आहे. त्यांनी हंगामी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली याला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. याचा अर्थ असा नाही की, अध्यक्षपद आपोआप रिकामे होणार आहे. सोनिया गांधी या अध्यक्षा आहेत. नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्या पदावर राहतील. ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे मात्र, ती तातडीने पूर्ण होईल, अशी शक्यता नाही. 

काँग्रेस कार्यकारी समितीच्या माध्यमातून नवीन अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया राबवली जाईल. आगामी काळात लवकरच ही प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न असून, त्याचा निकाल सर्वांसमोर मांडण्यात येईल. याबाबतची प्रक्रिया काँग्रेसच्या घटनेत लिहिलेली आहे. पक्षाने तिचे पालन करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर याबाबतची माहिती सर्वांना दिली जाईल, असे सिंघवी यांनी सांगितले. 

निसर्गाला जशी पोकळी नको असते. त्याचप्रकारे राजकीय पक्ष नेतृत्वाच्या पोकळीत वाटचाल करु शकत नाहीत. काँग्रेस उद्यापासून अध्यक्षाविना असेल असे कोणी म्हणत असेल त्यांनी स्वत:च याचा विचार करावा. अचानक मुदत संपत आल्यानंतर पक्षाच्या घटनेचा अर्थ लावण्याची घाई करणे कितपत योग्य आहे, असे सिंघवी यांनी नमूद केले. 

काँग्रेसचे नेते शशि थरुर यांनी पक्षाने पूर्ण वेळ अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी भूमिका घेतली आहे. यावरुन काँग्रेसच्या अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाने तातडीने पूर्ण वेळ अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. राहुल गांधी यांच्याकडे पुन्हा एकदा पक्षाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. परंतु, त्यांचीच पद स्वीकारण्याची इच्छा नसेल तर पक्षाने दुसरा पर्याय शोधालयला हवा. पक्षाला पुढील वाटचाल करण्यास पूर्ण वेळ अध्यक्षाची गरज आहे. 


Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com