सोलापुरच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते पॉझिटिव्ह

सोलापुरच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते या कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत.
सोलापुरच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते पॉझिटिव्ह
Sarkarnama Banner (13).jpg

सोलापूर : सोलापुरच्या  पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते या कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. पोलिस अधीक्षक सातपुते यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा पहिला डोस घेतला होता. 

तत्पूर्वी, जिल्हाधिकाऱ्यांनाही तसाच अनुभव आला होता. आतापर्यंत जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्‍त, महापालिका आयुक्‍त, महापौर, पोलिस उपायुक्‍तांसह काही नगरसेवकांना कोरोनावर मात केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही नुकतीच कोरोनावर मात करून पुन्हा कार्यरत झाले आहेत.

 दरम्यान मागील तीन-चार दिवसांत जे  प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष  संपर्कात आले आहेत, त्यांनी कोविडच्या लक्षणांवर नजर ठेवून कोरोनाची योग्य खबरदारी घ्यावी, असा मेसेज सातपुतेंनी आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाठविला आहे. कोरोनाचे उपचार त्या घेत आहेत. तोवर पोलिस अधीक्षपदाचा पदभार अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांच्याकडे राहणार आहे.


हेही वाचा : देशातील प्रत्येकाला कोरोना लस देणे अशक्य : अदर पूनावाला
 
नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, रुग्णसंख्या आणि मृत्यूचे आकडे विक्रमी पातळीवर पोचली आहे. यामुळे सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला असला तरी लशीचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर देशाला लशीचा पुरवठा करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. खुद्द 'सिरम'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी याची कबुली दिली आहे. सिरमच्या उत्पादन प्रकल्पावर मोठा ताण आला आहे, असे सांगून अदर पूनावाला म्हणाले की, सिरमकडून दर महिन्याला 6 ते 6.5 कोटी डोसचे उत्पादन होत आहे. आतापर्यंत आम्ही केंद्र सरकारला 10 कोटी डोस दिले असून, 6 कोटी डोस निर्यात केले आहेत. देशातील प्रत्येकाला लस द्यायची झाल्यास तेवढे उत्पादन आता आम्ही सध्या घेऊ शकत नाही. सर्व जगाला लस हवी आहे. परंतु, आम्ही सध्या भारताच्या गरजेवर  लक्ष केंद्रित केले आहे. असे असले तरी प्रत्येक भारतीयाला लस देणे आम्हाला सध्या तरी शक्य होत नाही.  सिरमकडून सवलतीच्या दरात केंद्र सरकारला कोरोना लस दिली जात आहे. यामुळे आम्हाला लशीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणखी 3 हजार कोटी रुपयांची गरज आहे. जूनपर्यंत उत्पादन वाढवायचे झाल्यास एवढा मोठा निधी लागेल. आम्ही केंद्र सरकारला 150 ते 160 रुपयांना लस देत आहोत. या लशीची सर्वसाधारण किंमत 20 डॉलर (सुमारे 1 हजार 500 रुपये) आहे, असे पूनावाला यांनी सांगितले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in